नियम मोडाल तर रजिस्ट्रेशन रद्द! मनपा आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 09:21 PM2020-09-16T21:21:42+5:302020-09-16T21:24:34+5:30

महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी कोविड -१९ च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मान्यता दिलेल्या खासगी रुग्णालयांसाठी आदेश जारी केले. यात खासगी रुग्णालयांवर शासननिर्देशानुसार जबाबदाऱ्या निश्चित करून आदेशाचे उल्लघन करणाऱ्या हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

If you break the rules, the registration will be canceled! Order of Municipal Commissioner | नियम मोडाल तर रजिस्ट्रेशन रद्द! मनपा आयुक्तांचे आदेश

नियम मोडाल तर रजिस्ट्रेशन रद्द! मनपा आयुक्तांचे आदेश

Next
ठळक मुद्दे कोविड रुग्णांवर उपचार करा: खासगी रुग्णालयांच्या विरोधातील तक्रारीची दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही दिवसांपासून शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मृत्यूंमध्येही वाढ झाली आहे. उपचारासाठी रुग्णांना भटकंती करावी लागत आहे. खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढल्या आहे. याची दखल घेत महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी कोविड -१९ च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मान्यता दिलेल्या खासगी रुग्णालयांसाठी आदेश जारी केले. यात खासगी रुग्णालयांवर शासननिर्देशानुसार जबाबदाऱ्या निश्चित करून आदेशाचे उल्लघन करणाऱ्या हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा इशारा दिला आहे.
शासकीय रुग्णालयांसोबतच आता कोविड- १९च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ३७ खासगी रुग्णालयांनाही मान्यता देण्यात आली आहे. या रुग्णालयातील ८० टक्के बेड कोविड रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात यावे. कोरोना रुग्णांना दाखल करण्यापूर्वी मनपाच्या कंट्रोल रूमला माहिती देणे बंधनकारक आहे. रुग्ण गंभीर असल्यास दाखल केल्यानंतर एका तासात माहिती देणे बंधकारक आहे.

अशा आहेत हॉस्पिटलच्या जबाबदाऱ्या
- खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना परस्पर भरती करू नये.
-शासननिर्देशानुसार कोविड रुग्णांसाठी ८० टक्के बेड आरक्षित ठेवावे.
- अतिगंभीर रुग्णाला सर्वप्रथम उपचार देणे.
-गंभीर रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवणे आणि त्याला स्टेबल करणे.
-थर्ड पार्टी विमा आहे, त्यांच्यावर उपचार करून क्लेमसाठी रुग्णालयानेच विमा कंपनींना पाठवावे.
- शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसारच बिल आकारावे.
- रुग्णाला दाखल करण्यापूर्वी मनपाच्या कंट्रोल रूमला माहिती देणे.
-गंभीर रुग्ण असल्यास भरती केल्यानंतर एका तासात माहिती देणे.

Web Title: If you break the rules, the registration will be canceled! Order of Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.