पावसात मोबाईलवर बोलाल तर...
By admin | Published: June 11, 2017 01:56 AM2017-06-11T01:56:52+5:302017-06-11T01:56:52+5:30
विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असेल तर मोबाईल, टेलिफोनचा उपयोग अजिबात करू नका.
ही सवय ठरू शकते जीवघेणी :
घरात व बाहेरही विजांपासून सावधान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असेल तर मोबाईल, टेलिफोनचा उपयोग अजिबात करू नका. आकाशात कडाडणारी वीज मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला इजा पोहचवू शकते. पावसाळ्यात तर अशी वीज जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे मोबाईलवर बोलणे टाळण्यासोबतच इंटरनेट सेवाही बंद करून ठेवणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात विजांचा कडकडाट ही नित्याचीच बाब आहे. आपणही त्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देत नाही. शेतात काम करणारे, पावसात झाडाखाली आडोसा घेणारे, तलावात पोहणाऱ्यांना आकाशात कडाडणाऱ्या विजेपासून अधिक धोका असतो. मात्र, काही खबरदारी घेतली तर यापासून बचाव करता येतो. राज्य सरकारच्या महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी यापासून सतर्क राहण्यासाठी काही दिशानिर्देश जारी केले आहेत. आपण घरात असलो तरीही विजेपासून बचावासाठी आवश्यक ती खबरधारी घ्यायला हवी. पाऊस सुरू असताना घरातील विजेवर चालणाऱ्या उपकरणांपासून दूर रहावे. मोबाईल, टेलिफोनचा उपयोग करू नये. खिडकी, दरवाजे बंद ठेवावे. घराच्या छतावर किंवा
वऱ्हांड्यात बसू नये. धातूपासून बनलेले पाईप, नळ, फवारा, वॉश बेसीन आदींच्या संपर्कापासून दूर रहावे.
डोक्याचे केस उभे झाले तर वीज पडण्याचा धोका
तज्ज्ञांच्या मते आकाशात वीज चमकत असेल व तुमच्या डोक्याचे केस उभे झाले, त्वचेला कंप झाला तर त्वरित खाली बसून तुमचे कान बंद करा. कारण, तुमच्या आसपास वीज कोसळणार आहे याचे हे संकेत आहेत.