डेंग्यू नकाे असेल तर काळजी घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:08 AM2021-07-27T04:08:29+5:302021-07-27T04:08:29+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : शहरात विषाणूजन्य ताप, मलेरिया व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ हाेत असतानाच स्थानिक नगर पालिका प्रशासनाने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : शहरात विषाणूजन्य ताप, मलेरिया व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ हाेत असतानाच स्थानिक नगर पालिका प्रशासनाने डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययाेजनांना सुरुवात केली आहे. यात शहराच्या विविध भागात डास प्रतिबंधात्मक औषधांची धुरळणी केली जात असून, नाल्यांची नियमित साफसफाई करणे, त्यात प्रतिबंधात्मक औषधे टाकणे, माेकळ्या जागेवर तणनाशकाची फवारणी करणे व घराेघरी जाऊन हे आजार हाेऊ नये यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत नागरिकांना माहिती दिली जात आहे.
शहरातील डेंग्यू, मलेरिया व विषाणूजन्य तापाच्या रुग्णसंख्येत वाढ हाेत आहे. या आजारांना राेखण्यासाठी आराेग्य विभागाने महिला बचत गटांच्या सदस्यांची मदत घेत जनजागृती करायला सुरुवात केली आहे. या महिला घराेघरी जाऊन नागरिकांना रुग्ण तपासणी व डासांच्या अळ्यांचे सर्वेक्षण करीत आहेत. कुलरमधील पाणी व गटारात टेमिफाेस हे औषध टाकत असून, त्यांना डेंग्यूपासून संरक्षण करण्याच्या उपाययाेजना सांगत आहेत.
मागील आठवड्यात काेसळलेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. चिखल व अस्वच्छता निर्माण झाल्याने नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या हाेत्या. त्याअनुषंगाने पालिकेने रविवार (दि. २५)पासून उपाययाेजनांना सुरुवात केली. त्यामुळे सध्या शहरातील विविध भागात धुरळणी करणाऱ्या मशीन फिरताना दिसून येतात. दुसरीकडे, नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.
...
काेरडा दिवस पाळा
कळमेश्वर-ब्राह्यणी शहर स्वच्छ राहील यावर भर दिला जात आहे. डेंग्यू व मलेरिया हे आजार डासांमुळे हाेत असल्याने डासांची शहरात पैदास हाेणार नाही, यासाठी उपाययाेजना केल्या जात आहे. डेंग्यूचे डास व त्यांची अंडी स्वच्छ पाण्यात आढळून येतात. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस काेरडा दिवस पाळावा, असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी केले आहे.
...
यावर अंमल करा
या आजारांना राेखण्यासाठी शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने केले जात आहे. नागरिकांनी मच्छरदाणीचा वापर करावा, घरात कुठेही अधिक काळ पाणी साठवून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. लहान मुलांना पूर्ण कपडे घालावेत. कुलर व फुलदाणीमध्ये डासांची लार्वी तयार हाेऊ नये यासाठी त्यातील पाणी सतत बदलत राहावे.
...
सध्या आमच्याकडे डेंग्यूच्या एका रुग्णाची नाेंद आहे. आमच्याकडे डेंग्यूच्या तपासणीची सुविधा नसल्याने रुग्ण खासगी हाॅस्पिटलमध्ये जातात. त्यामुळे रुग्णांची तंताेतंत आकडेवारी सांगणे कठीण आहे. शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मात्र वाढ हाेत आहे.
- डॉ. प्रीती इंगळे, वैद्यकीय अधीक्षक,
ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर.