आंदोलनात सहभागी झाल्यास वेतन कपात

By Admin | Published: July 11, 2016 02:42 AM2016-07-11T02:42:31+5:302016-07-11T02:42:31+5:30

अनुदानित आश्रम शाळेत कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विनाअनुमती आंदोलन व संघटनांच्या सभेत सहभाग घेतल्यास संबंधित शिक्षक ..

If you participate in the agitation, cut the salaries | आंदोलनात सहभागी झाल्यास वेतन कपात

आंदोलनात सहभागी झाल्यास वेतन कपात

googlenewsNext

प्रकल्प अधिकाऱ्यांचे निर्देश : प्रतिनिधींवर अंकुश
नागपूर : अनुदानित आश्रम शाळेत कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विनाअनुमती आंदोलन व संघटनांच्या सभेत सहभाग घेतल्यास संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात येणार आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
आदिवासी आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी पूर्वपरवानगी न घेता अनुपस्थित राहात असल्याचे संस्थाचालकांनी प्रकल्प अधिकऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत निदर्शनास आणले होते. अनेकदा शिक्षक व कर्मचारी वैयक्तिक कामासाठी रजा न घेता अनुपस्थित राहतात. याचा परिणाम शैक्षणिक कार्यावर पडतो. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन देयके एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात परस्पर सादर न करता संस्थेचे अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पाठविण्यात यावे. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापकांच्या अनुमतीनेच मुख्यालय सोडावे.
याबाबतची नोंद दस्तऐवजात करावी. तसेच अनुदानित आश्रम शाळा निवासी असल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांनी निवासी राहावे. परिसरात निवासाची व्यवस्था नसल्यास पाच किलोमीटर परिसरात निवास असावा. त्याशिवाय घरभाडे भत्ता मिळणार नाही, अशी सूचना या परिपत्रकातून केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: If you participate in the agitation, cut the salaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.