सावधान; चाईल्ड पाेर्नाेग्राफी सर्च केल्यास जावे लागेल तुरुंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 07:30 AM2021-10-06T07:30:00+5:302021-10-06T07:30:02+5:30

Nagpur News जर कुणी चाईल्ड पाेर्नाेग्राफीशी संबंधित साईट्स सर्च जरी केली तरी त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, असा इशारा पाेलिसांच्या सायबर क्राईम सेलने दिला आहे.

If you search for child pornography, you will have to go to jail | सावधान; चाईल्ड पाेर्नाेग्राफी सर्च केल्यास जावे लागेल तुरुंगात

सावधान; चाईल्ड पाेर्नाेग्राफी सर्च केल्यास जावे लागेल तुरुंगात

Next

 

दयानंद पाईकराव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लहान मुलांचे अश्लील फाेटाे काढणे, ते साेशल मीडियावर पाठविणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी सुद्धा असंख्य गुन्हेगार हा प्रकार करतात आणि सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकतात. सायबर क्राईम याबाबतीत सक्रिय असून त्यांच्यावतीने अशा गुन्हेगारांवर सातत्याने नजर ठेवण्यात येते. त्यामुळे जर कुणी चाईल्ड पाेर्नाेग्राफीशी संबंधित साईट्स सर्च जरी केली तरी त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, असा इशारा पाेलिसांच्या सायबर क्राईम सेलने दिला आहे.

दहा वर्षे शिक्षेची तरतूद

इलेक्ट्राॅनिक्स माध्यमातून किशाेरवयीन मुलामुलींचे फाेटाे, व्हिडीओ प्रसारीत करणे हा गंभीर गुन्हा आहे. असे साहित्य जवळ बाळगणेसुद्धा चुकीचे आहे. बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण करण्यासाठी केलेल्या २०१२ च्या कायद्यानुसार ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा हाेऊ शकते. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार अशा गुन्हेगारांसाठी १० वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

 

आतापर्यंत १९ जणांवर गुन्हे

सायबर गुन्हेगारांवर सायबर सेलचे लक्ष असते. मागील ९ महिन्यांपासून अशा १९ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. सायबर सेल याबाबत अधिक सतर्क झाले आहे.

चाईल्ड पाॅर्न पाहणे गंभीर गुन्हा

लहान मुलामुलींचे नग्न, अर्धनग्न फाेटाे, व्हिडीओ शेअर करणे हा गंभीर गुन्हा आहे. यावर सायबर सेलद्वारे कठाेर कारवाई करण्यात येते. त्यामुळे साेशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा, असे आमचे आवाहन आहे.

- केशव वाघ, एपीआय, सायबर सेल

Web Title: If you search for child pornography, you will have to go to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.