विजेचे कनेक्शन हवे असेल, तर बाजारातून मीटर घेऊन या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 08:00 AM2022-03-31T08:00:00+5:302022-03-31T08:00:06+5:30

Nagpur News परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याचे सांगितले जात आहे.

If you want electricity connection, bring a meter from the market! | विजेचे कनेक्शन हवे असेल, तर बाजारातून मीटर घेऊन या!

विजेचे कनेक्शन हवे असेल, तर बाजारातून मीटर घेऊन या!

Next
ठळक मुद्दे राज्यातील १०.५७ लाख अर्ज प्रलंबित१,५९६ रुपयांऐवजी ग्राहकांना मोजावे लागत आहेत ४,००० रुपये

कमल शर्मा 

नागपूर : महावितरणाचा डोलारा ढाळसल्यागत स्थितीत आहे. परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, विजेचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याचे सांगितले जात आहे. महावितरणकडून ज्या थ्री फेज मीटरसाठी १,५९६ रुपये घेत होती, तेच मीटर ग्राहकांना बाजारातून ४,००० रुपये मोजून खरेदी करावे लागत आहेत. सिंगल फेज मीटरसाठी ग्राहकांना ९४४ रुपयांऐवजी १,८०० रुपये मोजावे लागत आहेत.

नागपुरातच नव्हे, तर महावितरणच्या संपूर्ण क्षेत्रातच ही समस्या निर्माण झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच मीटरचा तुटवडा निर्माण झाल्याने, नवे कनेक्शन देण्याची कामे बंद आहेत. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तुटवड्यामुळे राज्यात नव्या कनेक्शनसाठी १०.५७ लाख अर्ज प्रलंबित आहेत. २.२ लाख ग्राहकांना डिमांड भरल्यावरही विजेचे कनेक्शन मिळालेले नाही. कनेक्शनचा आग्रह म्हणा वा घाई करणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून मीटर कंपन्यांची यादी सोपविली जात असून, बाजारातून मीटर आणण्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर, महावितरणकडून त्या मीटरची टेस्टिंग करून ते लावले जात आहेत. या प्रक्रियेत ग्राहकांना दुप्पट खर्च करावा लागत आहे. बहुतांश ग्राहक बाजारातील मीटरचे दर बघून, महावितरणचे मीटर येण्याची वाट बघत आहेत.

फॉल्टी मीटर बदलले नसल्यास मोठे नुकसान

राज्यात जवळपास १२ लाख मिटर फॉल्टी आहेत, ते बदलणे गरजेचे आहे, परंतु मीटरचा तुटवडा निर्माण झाल्याने ते कामही अडकले आहे. त्याचा महावितरणला मोठा फटका बसत आहेत. फाॅल्टी मीटरमुळे ग्राहकांना मागच्या तीन महिन्यांच्या अंदाजानुसार सरासरी बिल दिले जात आहे. सध्या उन्हाळा सुरू असून, हिवाळ्यातील अंदाजानुसार बिल दिले जात आहे. उन्हाळ्यात विजेची खपत प्रचंड वाढलेली असते. त्यानुसार, दिले जाणारे बिल फार कमी आहे. आर्थिक संकटात असलेल्या महावितरणला यामुळेही फटका बसत आहे.

उच्चस्तरीय तपासाची मागणी

सब ऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे महासचिव संजय ठाकूर यांनी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून प्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. कंपनी मीटर खरेदी करत नसल्यावरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. रोलेक्टचे मीटर खराब असल्याचे लिहिल्यामुळे २०१४ मध्ये कंपनीला १०० कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे, परंतु या प्रकरणापासून महावितरणने कसलाच धडा घेतला नसल्याचेही ठाकूर म्हणाले. येत्या १० ते १५ दिवसांत मीटरचा तुटवडा संपलेला असेल, असे महावितरणकडून सांगितले जात आहे.

...........

Web Title: If you want electricity connection, bring a meter from the market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज