लर्निंग लायसन्स काढायचेय, मास्क व हॅन्डग्लोज घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:30 AM2020-06-19T00:30:53+5:302020-06-19T00:33:47+5:30
चालक लर्निंग लायसन्ससाठी संगणकीय चाचणी देण्यासाठी येणाऱ्या अर्जदाराला मास्क व हॅन्डग्लोज घातल्याशिवाय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय चाचणी घेताना दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर, एका अर्जदाराची चाचणी झाल्यानंतर संगणक, की-बोर्ड सॅनिटाईज करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चालक लर्निंग लायसन्ससाठी संगणकीय चाचणी देण्यासाठी येणाऱ्या अर्जदाराला मास्क व हॅन्डग्लोज घातल्याशिवाय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय चाचणी घेताना दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर, एका अर्जदाराची चाचणी झाल्यानंतर संगणक, की-बोर्ड सॅनिटाईज करण्यात येणार आहे.
नागपूर (पूर्व) उप प्रादेशिक परिवहन कार्यालय हे स्वत:च्या नवीन इमारतीत मौजा चिखली देवस्थान, कळमना मार्केट, रिंग रोड, आदिवासी प्रकाशनगर जवळ, नागपूर येथे स्थलांतरित झाले असून आस्थापना विभाग वगळता इतर संपूर्ण विभागातील कामकाज हे नवीन इमारतीत सुरु करण्यात येत आहे. या कार्यालयामध्ये अनुज्ञप्ती जारी करणे, अनुज्ञप्ती दुय्यम करणे, अनुज्ञप्ती विषयक सर्व कामे, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, परवाना विषयक सर्व कामे, वायुवेग पथक, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करणे इत्यादी कामकाज नवीन इमारतीत सुरु करण्यात येत आहे.
लॉकडाऊन कालावधीपर्यंत लर्निंग लायसन्स घेतलेल्या व मधल्या काळात ज्यांची वैधता संपली आहे अशांची वैधता ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी आलेल्या वाहनांचे सॅनिटायझेशन केल्यानंतरच वाहनांची चाचणी घेण्यात येईल. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कार्यालयामध्ये सुरक्षित अंतर ठेवूनच, मास्क, हॅन्डग्लोज व सॅनिटाईझरचा वापर करुन आपली कामे गर्दी न करता करावीत. तसेच शासनातर्फे व कार्यालयातर्फे वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिल्या आहेत.