मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना करा - नाना पटोले 

By कमलेश वानखेडे | Published: September 7, 2023 06:57 PM2023-09-07T18:57:16+5:302023-09-07T18:57:46+5:30

पटोले म्हणाले, कुणालाही जात प्रमाणपत्र द्यायचे असेल तर त्याच्या मुळात जावे लागते.

If you want to give reservation to Marathas, do a caste-wise census says Nana Patole | मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना करा - नाना पटोले 

मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना करा - नाना पटोले 

googlenewsNext

नागपूर: बंजारा व मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगून देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आले. भाजप ने सत्तेसाठी चूक केली, ती भूमिका आता त्यांच्या अंगलट येत आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर जातीनिहाय जनगणना करा. कुणाच्या तोंडचा घास हिसकावून घेऊ नका, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी नागपुरात मांडली.

पटोले म्हणाले, कुणालाही जात प्रमाणपत्र द्यायचे असेल तर त्याच्या मुळात जावे लागते. कागदपत्रांची पडताळणी करून ते कोणत्या जातीचे आहेत हे ठरवावे लागते. त्याची एक प्रक्रिया आहे. सरकारला नियमाप्रमाणे ह्या गोष्टी करता येत नाही. कोणत्याही व्यक्तीला कोणत्या जातीत टाकता येत नाही. जे करू शकतं नाही त्याला सरकारने नाही म्हणावे. ओबीसी ही आग आहे. या आगीत सरकारने पडू नये, असा इशाराही त्यांनी दिला. - जंगलातील जनारांची मोजणी होते. मग माणसाची का होऊ नये. जातीनिहाय जनगणना हा यावर उपाय आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणीही पटोले यांनी केली. फडणवीस यांनी मराठ्यांना १६ टक्के आरक्षण देण्याची भूमिका मांडली होती. तीच भूमिका आता मनोज जरांगे पाटील मांडत आहेत. ओबीसी मधून आरक्षण नको ही मूळ मागणी मराठा समाजाने केली होती. आता दोन समाजात भांडणे लावून भाजप राज्यात मणिपूर करू इच्छित आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.

केंद्रात सरकार आल्यास आरक्षणाची ५० टक्के मर्यादा उठविणार
आमचे सरकार केंद्रात आले तर कुणाचाही वाटा न हिसकावता हिसकावत आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविली जाईल, असे आश्वासन पटोले यांनी यावेळी दिले. सर्व समाज बांधवांनी आक्रमक न होता संयम बाळगावा, असे आवाहानही त्यांनी केले.
 

Web Title: If you want to give reservation to Marathas, do a caste-wise census says Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.