अजनी मेट्रो स्टेशनला आयजीबीसीचे प्लॅटिनम मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:07 AM2021-06-05T04:07:17+5:302021-06-05T04:07:17+5:30

नागपूर : महामेट्रो नागपूरने पुन्हा एकदा पर्यावरणपूरक अग्रणीय प्रकल्पामध्ये उपलब्धी मिळवली आहे. अजनी मेट्रो स्टेशनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने ...

IGBC's Platinum Rating for Ajni Metro Station | अजनी मेट्रो स्टेशनला आयजीबीसीचे प्लॅटिनम मानांकन

अजनी मेट्रो स्टेशनला आयजीबीसीचे प्लॅटिनम मानांकन

Next

नागपूर : महामेट्रो नागपूरने पुन्हा एकदा पर्यावरणपूरक अग्रणीय प्रकल्पामध्ये उपलब्धी मिळवली आहे. अजनी मेट्रो स्टेशनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने (आयजीबीसी) आतापर्यंतचे सर्वांत मोठे प्लॅटिनम रेटिंग मिळाले आहे. प्रकल्पातील सर्व कार्यरत स्थानकांपैकी अजनी हे आयजीबीसी प्रमाणपत्र प्राप्त १४ वे मेट्रो स्टेशन आहे. रेटिंग आयजीबीसीच्या ग्रीन एमआरटीएस रेटिंग प्रणालीवर आधारित आहे.

यापूर्वी नागपूर मेट्रोच्या ऑरेंजलाइन मार्गावर खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट, जयप्रकाश नगर, रहाटे कॉलनी, अजनी चौक सीताबर्डी इंटरचेंज तसेच अ‍ॅक्वालाइन मार्गावर लोकमान्यनगर, बंसीनगर, वासुदेवनगर, सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झांसी राणी चौक मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. प्रशासकीय भवन मेट्रो भवनलादेखील हे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

आयजीबीसी प्लॅटिनम रेटिंग ही सौरऊर्जेपासून ६५ ऊर्जेचे निर्माण, मेट्रो स्थानकांवर बायो-डायजेस्टर्सची व्यवस्था, १०० पाण्याचा पुन:वापर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली तसेच स्टेशन आणि इतर इमारतींचे निर्माणकार्यावर आधारित असते. महामेट्रो शहरात एकमेव हरित उपक्रम राबवणारी एकमेव संस्था असून, पर्यावरण व्यवस्थापनाच्या क्षेत्रांत सर्वोच्च समजले जाणारे आयएसओ प्रमाणपत्र नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला यापूर्वीच प्राप्त झाले आहे. सदर प्रमाणपत्र डिझाइन, निर्माणकार्य तसेच मेट्रो संचालनालयादरम्यान पर्यावरण व्यवस्थापनाच्या धोरणाच्या अंमलबजावणीकरिता केलेल्या उपाययोजनांमुळे प्राप्त झाले आहे. महामेट्रोचे निर्माणकार्य पर्यावरणाचे समतोल राखून शहराच्या प्रगतीला चालना देण्याकरिता कटिबद्ध आहे. आयएसओ (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन) आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था असून, ठरविण्यात आलेल्या मानांकनाचे समन्वयन आणि एकत्रीकरण यामध्ये केले जाते. १४००१ ही एक पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली (ईएमएस) आहे, जी संस्थेच्या पर्यावरणीय प्रभावाचे मूल्यांकन करून त्यामध्ये सुधारणा करीत असते. मल्टी मॉडेल इंटिग्रेशन, सौरऊर्जा आणि प्रवाशांना आरामदेय सुविधांचा समावेश आहे.

महामेट्रोने वर्धा रोड आणि हिंगणा मार्गावर व्हर्टिकल गार्डन तयार केले असून, हिंगणा मार्गावर अंबाझरीजवळ २४ एकर जागेवर लिटिल वूड नावाने ६००० झाडं असलेले हरित जंगल तयार केले आहे. याव्यतिरिक्त अमरावती महामार्गावर लिटिल वूडजवळच लिटिल वूड एक्सटेन्शन येथे १४,५०० वेगवेगळ्या प्रजातीची झाडे लावली आहेत.

Web Title: IGBC's Platinum Rating for Ajni Metro Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.