आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे होणार टीकेचा भडिमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:08 AM2021-05-31T04:08:11+5:302021-05-31T04:08:11+5:30
नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या स्थायी समितीच्या सन २०२१-२२च्या २७९६.०७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर दिसून आला. ...
नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या स्थायी समितीच्या सन २०२१-२२च्या २७९६.०७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर दिसून आला. अर्थसंकल्पात नवीन कर, कोणतीही नवी योजना समाविष्ठ करण्यात आली नाही. जुन्या योजना पूर्ण करण्याशिवाय काही योजना फक्त नावापुरत्या सादर करण्यात आल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली असतानाही, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ २ टक्के निधी म्हणजे ५५.४५ कोटी रुपयांची तरतूद आरोग्यासाठी केली. यामुळे विरोधी पक्षातील नगरसेवक अर्थसंकल्पावर सोमवारी ३१ मे रोजी आयोजित ऑनलाइन चर्चेत सत्तापक्षावर टीकेचा भडिमार करू शकतात, तसेच प्रभागात बंद पडलेली कामे आणि मान्सूनपूर्व कामांची अपूर्ण तयारी यावरही नगरसेवक प्रशासनाला धारेवर धरू शकतात. मागील वर्षी वॉर्ड निधीत २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती, परंतु या वर्षी १३ लाखांचीच तरतूद करण्यात आली, याशिवाय प्राधान्यक्रमासह इतर विकासकामे झाली नाहीत. इतर रखडलेल्या प्रकल्पांमुळेही नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
..........