भाषा आणि लिपीच्या सुधारणेकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:09 AM2020-12-22T04:09:09+5:302020-12-22T04:09:09+5:30
- सुनीलकुमार लवटे : सुमतीबाई-भालचंद्र व्याख्यानमाला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रभाषा नसलेला भारत हा एकमेव देश आहे. ...
- सुनीलकुमार लवटे : सुमतीबाई-भालचंद्र व्याख्यानमाला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रभाषा नसलेला भारत हा एकमेव देश आहे. मात्र, प्रादेशिक भाषांचा उपयोग भारतीयतेची उभारणी करण्याऐवजी प्रादेशिक अस्मितावाचक केल्या जात आहेत. त्याचा फटका राज्यघटनेतील मूल्यांना बसतो आहे. भाषा आणि लिपीच्या सुधारणेकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रश्न उद्भवत असल्याचे प्रतिपादन प्रख्यात लेखक डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी केले.
विदर्भ सांस्कृतिक परिषदेच्या वतीने आयोजित सुमतीबाई-भालचंद्र व्याख्यानमालेत ते बोलत होते.
भाषा, साहित्य आणि भारतीयता यांचे नाते दृढ करण्याची नितांत गरज आहे. पंथभेद विसरून धर्म आणि राज्य वेगळे ठेवणारी धर्मनिरपेक्षता हेच भारतीयतेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. राज्यघटनेने दिलेल्या सप्तस्वातंत्र्याचे न्याय्य रक्षण, लोकतांत्रिक समाजवाद, स्वातंत्र्य, समता, बंधूता यावरील श्रद्धा या मार्गाने देशाचे ऐक्य, हेच भारतीयतेचे निकष असल्याचे लवटे म्हणाले. आभासी माध्यमाद्वारे पार पडलेल्या या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले यांनी केले. संचालन अजेय गंपावार यांनी केले. स्वागत डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले तर आभार विदर्भ सांस्कृतिक परिषदेचे कार्यवाह सुनील पाटील यांनी मानले. तांत्रिक बाजू प्रा. अनिकेत पाटील यांनी सांभाळली.
........