उपराजधानीत मान्सूनपूर्व अभियानाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:51 PM2019-06-12T12:51:51+5:302019-06-12T12:53:10+5:30

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. वादळी वारे आणि तुरळक पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. वादळी वाऱ्यांचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे.

Ignoring pre-monsoon preparation | उपराजधानीत मान्सूनपूर्व अभियानाकडे दुर्लक्ष

उपराजधानीत मान्सूनपूर्व अभियानाकडे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देतयारीच्या नावावर वीज वितरण कंपनीचा टाइमपास

कमल शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. वादळी वारे आणि तुरळक पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. वादळी वाऱ्यांचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे. वादळी वाºयाचा तडाखा बसल्याने आता यंत्रणा जागी झाली आहे. साप्ताहिक मेंटेनन्सच्या नावावर तास तासभर वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. काम पूर्ण करण्याच्या नावावर बुधवारसोबतच इतरही दिवस वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. विभागातर्फे दावा करण्यात येत आहे की, वादळी वाºयापासून यंत्रणेला नुकसान पोहचू नये म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जनतेने वीज विभागाच्या दाव्याला मान्य करून, उकाड्यात दिवस काढले. प्रत्यक्षात मात्र विभागाने मान्सूनपूर्व तयारीच्या नावावर केवळ टाइमपास केल्याचे दिसत आहे. त्यामुळे वितरण प्रणालीला वादळी वाऱ्यांचा मारा सहन करण्यास असक्षम ठरली आहे. त्यामुळेच वादळी वारे सुरू झाल्याबरोबर वीज कंपनी होणारी हानी लक्षात घेता, वीज पुरवठा खंडित करीत आहे. मात्र याला ‘हॅण्ड ट्रिपिंग’चे नाव देऊन नुकसानीपासून बचाव करण्यासाठी पुरवठा खंडित करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर विभागाकडून असेही सांगण्यात येत आहे की, वाºयांची गती जास्त असल्याने समस्या निर्माण होत आहे. वाºयाच्या वेगाने विजेचे खांब वाकायला लागले आहे. झाडांच्या फांद्या विजेच्या तारावर पडल्याने तारा तुटत आहेत.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की, वीज कंपन्यांनी मान्सूनपूर्व तयारीच्या नावावर अखेर केले काय आहे. लोकमतने शहरात निर्माण झालेल्या विजेच्या संकटामुळे शहरातील विविध भागातील वीज वितरण यंत्रणेचा आढावा घेतला. यावरून स्पष्ट झाले की, महावितरण असो की एसएनडीएलच्या कर्मचाºयांनी मान्सूनपूर्व तयारीच्या नावावर केवळ टाइमपास केला आहे. दोन्ही कंपन्यांच्या क्षेत्रात विजेचे खांब व विद्युत तारा झाडांमध्ये आलेल्या आहेत. वादळामुळे झाडाच्या फांद्या तुटण्याची शक्यता आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, ट्रान्सफार्मरमध्ये असणाºया आॅईलची लेव्हलसुद्धा तपासण्यात आली नाही. काही ठिकाणचे कंडक्टर व जम्पर हलायला लागले आहे.

वीज कंपन्यांसाठी ३१ मे आली नाही
नियमानुसार ३१ मे च्या पूर्वी मान्सून पूर्वतयारी पूर्ण करणे गरजेचे आहे. परंतु अद्यापही वीज कंपन्यांसाठी ही तिथी आली नाही. जून महिन्यातही मेंटेनन्ससाठी वीज खंडित करण्यात येत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, पाऊस झाल्याने झाडाच्या फांद्या वाढतात. यासाठी काम सतत सुरू असते.

मेंटेनन्सचे टेंडर ठरलेले नाही
आश्चर्य म्हणजे मान्सून पूर्वतयारीचा वेळ गेल्यानंतरही महावितरण मेंटेनन्सचे टेंडर ठरवू शकली नाही. ठेकेदारांचे म्हणणे आहे की, टेंडरचे दर कमी असल्यामुळे आम्ही काम करू शकत नाही. यासंदर्भात ठेकेदार व व्यवस्थापनाशी झालेल्या बैठकीतूनही काहीच निष्कर्श निघालेले नाही. यावरून लक्षात येते की, मान्सूनची काय तयारी झाली आहे.

Web Title: Ignoring pre-monsoon preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज