‘इग्नु’ला ‘नॅक’ची ‘ए प्लस प्लस’ श्रेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 10:49 AM2021-01-13T10:49:16+5:302021-01-13T10:49:42+5:30
Nagpur News ‘इग्नु’ला (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) ‘नॅक’तर्फे ‘ए प्लस प्लस’ श्रेणी देण्यात आली आहे. अशा प्रकारची मान्यता मिळविणारी ‘इग्नु’ हे देशातील पहिलेच मुक्त विद्यापीठ ठरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘इग्नु’ला (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) ‘नॅक’तर्फे ‘ए प्लस प्लस’ श्रेणी देण्यात आली आहे. अशा प्रकारची मान्यता मिळविणारी ‘इग्नु’ हे देशातील पहिलेच मुक्त विद्यापीठ ठरले आहे.
‘नॅक’तर्फे ‘डिस्टन्स एज्युकेशन’ देणाऱ्या उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन व मान्यतासंदर्भात नियमावली तयार करण्यात आली होती. याअंतर्गत सात मापदंडांच्या आधारावर मुक्त विद्यापीठांचे मूल्यांकन करण्यात आले. ‘नॅक’च्या चमूने ‘इग्नु’च्या प्रादेशिक केंद्रांचादेखील दौरा केला होता. यानंतर ‘नॅक’ने ‘इग्नु’ला ‘ए प्लस प्लस’ ही श्रेणी प्रदान केली. विशेष म्हणजे ‘नॅक’तर्फे मूल्यांकनादरम्यान देशभरातील ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे मतदेखील विचारण्यात आले होते. ‘नॅक’च्या चमूत सात विद्यमान कुलगुरूंचा समावेश होता.