आयआयएम-नागपूरचे उपकेंद्र पुण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:13 AM2021-09-08T04:13:12+5:302021-09-08T04:13:12+5:30
नागपूर : आयआयएम-नागपूरचे उपकेंद्र पुण्यात स्थापन करण्यात येणार आहे. पुणे येथील सीआयआरटी या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून ...
नागपूर : आयआयएम-नागपूरचे उपकेंद्र पुण्यात स्थापन करण्यात येणार आहे. पुणे येथील सीआयआरटी या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून तेथील परिसरातच उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. सीआयआरटी परिवहन क्षेत्राची कार्यक्षमता सुधारण्यासंदर्भात कार्य करते.
सहा वर्षांपूर्वी आयआयएम-नागपूरची स्थापना झाली. सुरुवातीला आयआयएम-अहमदाबादकडे या संस्थेचे पालकत्व होते. आयआयएमने दोन वर्षाचा व्यवस्थापन शास्त्राचा पदव्युत्तर कार्यक्रम विकसित केला आहे. उद्योग जगताचे सहकार्य व सहभाग मिळावा यादृष्टीने पुण्यात उपकेंद्राची स्थापना करण्यात येत आहे. येथे सुरुवातीला प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या व्यावसायिकांसाठी कमी मुदतीचे व दीर्घ मुदतीचे व्यवस्थापनाचे शिक्षण देणारे आणि एमबीएचे अभ्यासक्रम सुरू केले जातील. पुण्यातील या प्रकल्पाचा प्रारंभ म्हणून पुण्याच्या औद्योगिक जगतातील मान्यवरांशी आणि तज्ज्ञांशी ७ सप्टेंबर रोजी चर्चा आयोजित केली होती. उद्योग क्षेत्रातील दोनशेहून अधिक प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. यावेळी आयआयएम नागपूरच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी, संचालक डॉ. भीमराया मैत्री उपस्थित होते.