आयआयएम नागपूरचे आठ नवे पीजी सर्टिफिकेट प्रोग्राम सप्टेंबरपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:14+5:302021-07-04T04:07:14+5:30

राहुल लखपती नागपूर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर (आयआयएमएन) देशातील सर्व आयआयएममध्ये १४ व्या स्थानावर असून, शिक्षण मंत्रालयाच्या ...

IIM Nagpur's eight new PG certificate programs till September | आयआयएम नागपूरचे आठ नवे पीजी सर्टिफिकेट प्रोग्राम सप्टेंबरपर्यंत

आयआयएम नागपूरचे आठ नवे पीजी सर्टिफिकेट प्रोग्राम सप्टेंबरपर्यंत

Next

राहुल लखपती

नागपूर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर (आयआयएमएन) देशातील सर्व आयआयएममध्ये १४ व्या स्थानावर असून, शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेममध्ये (एनआयआरएफ) ४० वा क्रमांक मिळविला आहे. आयआयएनएमचे नागपुरात सहावे वर्ष असून, ही चांगली कामगिरी करीत आहे.

आयआयएमएन सप्टेंबर-२०२१ अखेरपर्यंत आठ नवीन पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्राम सुरू करणार आहे. ४ जुलैपासून ‘डेटा सायन्स फॉर बिझनेस एक्सलन्स अ‍ॅण्ड इनोव्हेशन’ हा पहिला प्रोग्राम सुरू करीत आहे. लोकमतशी बोलताना आयआयएमएनचे संचालक डॉ. भीमराया मेट्री म्हणाले, सध्याच्या वातावरणात उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी कुशल व्यवस्थापकांची गरज आहे. अशा वातावरणात अकॅडमिक सक्षम आणि उद्योगात अनुभवी, पण सर्वांगीण अनुभव असलेले व्यवस्थापक अथवा लीडरची आवश्यकता आहे.

ही पोकळी दूर करण्यासाठी आयआयएमएनने डाटा सायन्स फॉर बिझनेस एक्सलन्स अँड इनोव्हेशन, बिझनेस मॅनेजमेंट फॉर आय प्रोफेशनल्स, फायनान्शियल टेक्नॉलॉजीज (फिनटेक), डिजिटल मार्केटिंग अ‍ॅण्ड मार्केटिंग अ‍ॅनालिटिक्स, जनरल मॅनेजमेंट सिनिअर मॅनेजमेंट प्रोग्राम, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, ऑपरेशन्स मॅनेजमेंट आणि सायबर सिक्युरिटी अँड डेटा अ‍ॅनालिटिक्स हे सर्टिफिकेट प्रोग्राम आणले आहेत. आयआयएमएनने आणलेल्या कोर्सचा सर्वोत्तम भाग म्हणजे हे सर्व मिश्रित कोर्स आहेत. या कोर्सचे प्रशिक्षण ऑनलाईन, ऑफलाईन आणि प्राध्यापक विद्यार्थ्यांसोबत वन-टू-वन संवाद साधून होणार आहे. प्रोग्रामच्या अखेरीस एक टाऊन हॉल (त्याच्या प्रकारचा पहिला उपक्रम) प्राध्यापकांसह आयोजित केला जाईल. अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमांचे डिझाईन संशोधन आणि अनेक उद्योजकांशी बोलून आणि त्यांचे मुद्दे समजून घेतल्यानंतर केली आहे. दोन्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ संकरित मिश्रित कार्यक्रमाच्या वेळी इच्छुकांना शिकवतील. ते आयआयएमएन कॅम्पसमध्ये एका आठवड्यासाठी कार्यक्रमाच्या कालावधीत हजेरी लावतील, असे मेट्री यांनी सांगितले.

सायबर सिक्युरिटी अ‍ॅण्ड डाटा अ‍ॅनालिटिक्समध्ये सर्टिफिकेट कोर्स

जास्तीत जास्त बिझनेस ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वळत असल्याने सायबर सिक्युरिटी अ‍ॅण्ड डाटाचे जतन करणे जास्त महत्त्वाचे आहे. आम्ही विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील अभ्यास आणि अशा परिस्थितींचा सामना करण्याचे शिक्षण देणार आहे. त्याचा फायदा उद्योगांना होणार आहे. सायबर सिक्युरिटी अ‍ॅण्ड डाटा अ‍ॅनालिटिक्स प्रोग्राम हा युनिव्हर्सिटी ऑफ मेमफिस टेनेसी-अमेरिका अंतर्गत फेडेक्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसोबत (एफआयटी) आंतरराष्ट्रीय संयुक्त प्रमाणपत्र कार्यक्रम आहे.

Web Title: IIM Nagpur's eight new PG certificate programs till September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.