‘आयआयटी-मद्रास’तर्फे ‘सॉफ्ट स्किल्स’ प्रशिक्षणाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:09 AM2021-09-22T04:09:33+5:302021-09-22T04:09:33+5:30
नागपूर : ‘आयआयटी-मद्रास’तर्फे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एनपीटीईएल’च्या माध्यमातून १५ दिवसीय ‘सॉफ्ट स्किल्स’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणात डॉ. ...
नागपूर : ‘आयआयटी-मद्रास’तर्फे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एनपीटीईएल’च्या माध्यमातून १५ दिवसीय ‘सॉफ्ट स्किल्स’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठाशी संलग्नित स्वायत्त संस्था असलेल्या जे. डी. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाचे ३० विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना मुलाखतीची तयारी, रोजगार मूल्यमापन आणि स्पोकन इंग्लिश चाचणी इत्यादी विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांची ‘मॉक’ मुलाखतदेखील घेण्यात आली. रोजगारक्षमता चाचणी परीक्षेतून प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड जाली होती. ‘ईटीसी’च्या विभाग प्रमुख प्रा. नीतू ज्ञानचंदानी यांनी यासाठी पुढाकार घेतला तर प्रा. प्रणाली लंगडे यांनी प्रशिक्षण सत्राचे संयोजन केले. जयदेव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय अग्रवाल, सचिव अजय अग्रवाल, विश्वस्त जयेश गोयल, संचालक प्रा. एस. एम. बंग, कार्यकारी संचालक अविनाश दोसरटवार, प्राचार्य डॉ. एस. व्ही. सोनेकर यांनी या प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला.