शहरात जाहिरात एजन्सींचे अवैध फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:15 AM2021-09-02T04:15:14+5:302021-09-02T04:15:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात काही ठिकाणी जाहिरात एजन्सीमार्फत अवैध फलक लावण्यात आले आहेत. याचा शोध घेऊन त्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात काही ठिकाणी जाहिरात एजन्सीमार्फत अवैध फलक लावण्यात आले आहेत. याचा शोध घेऊन त्यांना काळ्या यादीत टाका, असे निर्देश मनपाच्या स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी मंगळवारी बैठकीत दिले.
काही एजन्सींनी ग्राऊंड रेंट अदा केलेला नाही. त्यांना काळ्या यादीत टाका, शहरातील जाहिरात फलकांसंदर्भात सन २००२ मध्ये धोरण निश्चित करण्यात आले होते. याला २० वर्षे झाली. त्यामुळे याबाबत नवीन धोरण निश्चित करा, शहरात लावण्यात आलेल्या वैध-अवैध फलकांचे सर्वेक्षण करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी राजेंद्र सोनकुसरे, सदस्या रूपा राय, आशा उईके, मनोजकुमार गावंडे, उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) सोनाली चव्हाण, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, नगर रचनाकार हर्षल गेडाम, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, श्रीकांत वैद्य आदी उपस्थित होते.