गुरांच्या अवैध वाहतुकीचा कंटेनर पकडला, दोन अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 01:23 PM2022-01-16T13:23:13+5:302022-01-16T13:30:19+5:30
कंटेनरची तपासणी केली असता, त्यात ३१ गाई व सात बैलांना निर्दयतेने काेंबून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे आढळले. ही गुरांची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी दाेघांनाही अटक केली.
नागपूर : पाेलिसांनी निमटाेला चाैक परिसरात केलेल्या कारवाईत गुरांच्या अवैध वाहतुकीचा कंटेनर पकडला. यात ३८ जनावरांची सुटका करीत ट्रकचालकासह दाेघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १३ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये कंटेनरचालक मुश्ताक फिराेज अली खान (२४, रा. पुराना भाेईपुरा, कामठी) व सलाम शहीद खान (२७, रा. सालई, ता. वरघाट, जि. शिवनी, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. खवासा टाेल नाका येथून गुरांच्या वाहतुकीचा कंटेनर जात असल्याची गुप्त सूचना पाेलिसांना मिळाली हाेती. त्याआधारे त्यांनी निमटाेला चाैक येथे नाकाबंदी सुरू केली हाेती.
दरम्यान, एमएच-४०/बीजी-९५७८ क्रमांकाच्या कंटेनर चालकाने नाकाबंदीचे बॅरिकेट्स उडवून तेथून पळ काढला. लगेच पाेलिसांनी पाठलाग करीत पाेलीस स्टेशन परिसरात कंटेनर अडविला. तेथेही चालकाने पाेलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाेलिसांनी माेठ्या शिताफीने दाेघांनाही डाेंगरताल राेडवर ताब्यात घेतले.
कंटेनरची तपासणी केली असता, त्यात ३१ गाई व सात बैलांना निर्दयतेने काेंबून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे आढळले. ही गुरांची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी दाेघांनाही अटक केली. या कारवाईत तीन लाख ८० हजार रुपये किमतीच्या गुरांसह कंटनेर असा एकूण १३ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सर्व गुरांना गाेविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे पाठविण्यात आल्याची माहिती ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी दिली.
याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी विविध कलामान्वये गुन्हा नाेंदवून दाेघांना अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांच्या नेतृत्वात पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड, राकेश नालगुलवार, सचिन डायलकर, शिवचरण नागपुरे यांच्या पथकाने केली.