लॉन व बिअरबारचे अवैध बांधकाम तोडले, नासुप्रची कारवाई
By गणेश हुड | Published: December 29, 2023 06:57 PM2023-12-29T18:57:52+5:302023-12-29T18:58:03+5:30
गृहनिर्माण सोसायट्यातील अतिक्रमणावर हातोडा
नागपूर: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मोहीम राबविली जात आहे. शुक्रवारी अतिक्रमण विरोधी पथकाने मौजा नारी भागातील खसरा क्रमांक १३० वरील मनमित लॉन आणि बियरबार येथील अधिकृत बांधकाम जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केले.
तसेच मौजा नारी, येथील प्लॉट क्रमांक ८२, ११७, १८२. २०५, २६९ ऐ खसरा क्र. १२९/१-३, समाजभूषण गृह निर्माण सह. संस्था, भुखंड क्र. १४०, खसरा क्र. ८० बंधु गृहनिर्माण संस्था, खसरा क्र. १२९/४, १२९/६, १३०/६ येथील भु. क्र. ११८ पूर्वेस रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. खसरा क्र. ६१/१, २, ३, ४, आदिवासी समाज उन्नती संस्था येथील मोकळ्या जागेवरील ओट्याचे अनधिकृत बांधकाम, देशमुख लेआऊट, खसरा क्र. १४४/२, १४५/२, १४७/२, १४८/१ येथील लेन मधील गटार लाइर्नवरील व्यवसायिक बांधकाम तोडण्यात आले ही कारवाई नासुप्रचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी व महाव्यवस्थापक अविनाश कातडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई नासुप्रचे विभागीय अधिकारी (उत्तर) कमलेश टेंभुर्णे, समन्वय अधिकारी मौहर पाटील, शाखा अभियंता विजय तांबडे, अतिक्रमण पचक प्रमुख सुभाष पंडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
कापसी (खूर्द )येथील व्यावसायिक बांधकाम हटविले
विभागीय कार्यालय (पूर्व) महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंर्तगत मौजा कापसी (खुर्द), खसरा क्र. ८, १०, वरील व्यावसायिक स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. ही कारवाई अविनाश कातडे यांचे मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.