अवैध होर्डिंग्स करताहेत शहराला विद्रुप()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:09 AM2021-09-14T04:09:59+5:302021-09-14T04:09:59+5:30

जबाबदार लोकांवर व्हावी कारवाई : मनपाचा महसूलही बुडतोय लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर ...

Illegal hoardings make the city look ugly () | अवैध होर्डिंग्स करताहेत शहराला विद्रुप()

अवैध होर्डिंग्स करताहेत शहराला विद्रुप()

Next

जबाबदार लोकांवर व्हावी कारवाई : मनपाचा महसूलही बुडतोय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहराचा चौफेर विकास होत असल्याचा दावा केला जातो. दुसरीकडे अनधिकृत होर्डिंगमुळे शहरातील चौक, मुख्य रस्त्यांचे विद्रुपीकरण झाले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सिमेंट रोड, चौकांचे सौंदर्यीकरण, मेट्रो रेल्वे यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. परंतु, दुसरीकडे अवैध होर्डिंगमुळे शहर विद्रुप होत असून, महापालिकेच्या महसुलातही फटका बसत आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांचे वाढदिवस, नियुक्ती, कोचिंग क्लासेस, खासगी संस्थांच्या अवैध होर्डिंगमुळे शहरातील चौक, रस्ते विद्रुप होत आहे. याला वेळीच आळा घालण्याची गरज आहे. अवैध होर्डिंगवर कारवाई करण्याची जबाबदारी मनपाच्या झोन स्तरावरील अधिकाऱ्यांची आहे. परंतु, कठोर कारवाई होत नाही.

...

दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करावे

मनपाला अवैध होर्डिंग लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करून पोलिसांत गुन्हे दाखल करता येतात. असे केल्यास अवैध होर्डिंगला आळा बसू शकतो. मनपाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होऊ शकतो; परंतु कारवाई केली जात नाही.

....

होर्डिंगच्या माध्यमातून ६.५० कोटी

मनपाला होर्डिगच्या माध्यमातून कर स्वरुपात वर्षाला जवळपास ६.५० कोटींचा महसूल प्राप्त होते. अवैध होर्डिंगला आळा बसल्यास या महसुलात वाढ होऊ शकते. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

...

झोन स्तरावरील कारवाईला मर्यादा

अवैध होर्डिंग, बॅनर विरोधात मनपाच्या झोन कार्यालयामार्फत कारवाई केली जाते. परंतु, होर्डिंग राजकीय पक्षाच्या नेत्यांचे वा नगरसेवकांचे असल्याने याची दखल घेतली जात नसल्याने कारवाईला मर्यादा आहेत. अवैध होर्डिंगसंदर्भातील कारवाईची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना यासाठी दोषी धरल्यास अवैध होर्डिंगला आळा

...

Web Title: Illegal hoardings make the city look ugly ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.