अवैध दारू वाहतूकदार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:06 AM2021-07-04T04:06:46+5:302021-07-04T04:06:46+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : पाेलिसांनी वाडी परिसरात गेलेल्या कारवाईमध्ये देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दाेघांना ताब्यात घेत अटक ...

Illegal liquor transporter arrested | अवैध दारू वाहतूकदार अटकेत

अवैध दारू वाहतूकदार अटकेत

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : पाेलिसांनी वाडी परिसरात गेलेल्या कारवाईमध्ये देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दाेघांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून कार व दारूच्या बाटल्या असा एकूण १ लाख १० हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

दशरथ अशोक मनोहरे (३५, रा. माहुरझरी, ता. नागपूर ग्रामीण) व सूरज निरंजन वानखेडे (३१, रा. टेकडी वाडी), अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. वाडी पाेलिसांचे पथक शुक्रवारी रात्री गस्तीवर हाेते. त्यांना वाडी परिसरातून एमएच-३१/झेड-५८९३ क्रमांकाची कार जाताना दिसली. संशय आल्याने पाेलिसांनी ती कार थांबवून झडती घेतली. यात पाेलिसांना कारमध्ये देशीदारूच्या सात पेट्या आढळून आल्या.

ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी कारमधील दाेघांना अटक करीत कार व दारू ताब्यात घेतली. या कारवाईमध्ये ९० हजार रुपये किमतीची कार आणि २० हजार १६० रुपये किमतीची दारू असा एकूण १ लाख १० हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक साजिद अहमद, हवालदार सुनील मस्के यांच्या पथकाने केली.

030721\img_20210703_143252.jpg

अवैध दारूची वाहतूक करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Web Title: Illegal liquor transporter arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.