मागासवर्गीयांकडून अवैध शुल्क वसुली

By Admin | Published: July 25, 2016 02:20 AM2016-07-25T02:20:25+5:302016-07-25T02:20:25+5:30

शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतेवेळी शुल्क वसूल करूनये असे निर्देश राज्य शासनाने वेळोवेळी जारी केले आहेत.

Illegal Recovery from Backward Classes | मागासवर्गीयांकडून अवैध शुल्क वसुली

मागासवर्गीयांकडून अवैध शुल्क वसुली

googlenewsNext

शासन निर्देशांना वाटाण्याच्या अक्षता : महाविद्यालयांवर वचक कुणाचा ?
योगेश पांडे नागपूर
शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतेवेळी शुल्क वसूल करूनये असे निर्देश राज्य शासनाने वेळोवेळी जारी केले आहेत. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील काही संलग्नित महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शुल्क घेण्यात येत आहेत. सामाजिक न्याय खात्याकडेदेखील यासंदर्भात तक्रारी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतेवेळी शुल्क वसूल करू नये, असे निर्देश २१ एप्रिल १९८७ रोजी उच्च न्यायालयाने दिले होते. समाज कल्याण विभागानेदेखील यासंदर्भात २००३ साली परिपत्रक काढले होते. राज्य शासनाकडून वारंवार यासंदर्भात सूचना देण्यात येतात. नागपूर विद्यापीठात सध्या विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या निर्देशावरून प्रशासनाने पत्र जारी केले आहे. विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांत प्रवेशाच्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या शुल्काची प्रतिपूर्ती केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीद्वारे करण्यात येते.
परंतु काही महाविद्यालयांत प्रवेशाच्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शुल्क भरायला लावण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी नियमांवर बोट ठेवले तर त्यांना आपल्या सोईच्या अटी सांगण्यात येत आहेत. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर शुल्क परत करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात येत आहे.

Web Title: Illegal Recovery from Backward Classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.