रेतीची अवैध साठवणूक, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:33+5:302021-06-11T04:07:33+5:30
जलालखेडा : पाेलिसांनी खडकी अंबाडा शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची अवैधरीत्या साठवणूक करणाऱ्या आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात १ लाख ...
जलालखेडा : पाेलिसांनी खडकी अंबाडा शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची अवैधरीत्या साठवणूक करणाऱ्या आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात १ लाख ३४ हजार रुपये किमतीचा रेतीसाठा जप्त करण्यात आला.
खडकी अंबाडा शिवारात आराेपी दिलीपराव पुंडलिकराव चाैरे, रा. सायवाडा, प्रवीण श्रावण भड, रा. अंबाडा व इतर अनाेळखी व्यक्तींनी शासनामार्फत काेणताही लिलाव व राॅयल्टी आकारली नसताना एकूण ६७ ब्रास रेतीची चाेरी करून अवैधरीत्या साठवणूक केल्याचे आढळून आले. या कारवाईत पाेलिसांनी १ लाख ३४ हजार रुपये किमतीचा रेतीसाठा जप्त केला. याप्रकरणी गुणवंत माणिकराव धवड (५६, रा. स्टेश्न राेड, काटाेल, ह.मु. जलालखेडा) यांच्या तक्रारीवरून जलालखेडा पाेलिसांनी भादंवि कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपींचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास पाेलीस नाईक माेरेश्वर चलपे करीत आहेत.