कारमधून माेहफुलाची अवैध वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:12 AM2021-08-22T04:12:20+5:302021-08-22T04:12:20+5:30
खापा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. २०) सकाळी १० वाजताच्या सुमारास खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील ...
खापा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. २०) सकाळी १० वाजताच्या सुमारास खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काेथुर्णा शिवारात केलेल्या कारवाईमध्ये माेहफुलाची अवैध वाहतूक करणारी कार पकडली. यात कारचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून १ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
रासिव वसीम शेख (२३, रा. मनसर, ता. रामटेक) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी कारचालकाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खापा परिसरात गस्तीवर असताना, त्यांना या भागातून रामटेकच्या दिशेने दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या भागातील काेथुर्णा शिवारात नाकाबंदी करीत वेगात जाणारी एमएच-३१/सीएन-१०२८ क्रमांकाची कार थांबविली आणि झडती घेतली. त्यांना कारमध्ये दाेन क्विंटल माेहफुले आढळून आली.
ती माेहफुलाची अवैध वाहतूक असल्याने तसेच ती माेहफुले दारू तयार करण्यासाठी नेली जात असल्याचे चाैकशीत सपष्ट हाेताच, पाेलिसांनी कारचालक रासिव यास अटक केली. त्याच्याकडून एक लाख रुपयाची कार व १४ हजार रुपयाची दाेन क्विंटल माेहफुले असा एकूण १ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी खापा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फाैजदार बाबा केचे, हवालदार चंद्रशेखर गडेकर, नीलेश बर्वे, राजू रेवतकर यांच्या पथकाने केली.