रेतीची अवैध वाहतूक सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:09 AM2021-03-10T04:09:49+5:302021-03-10T04:09:49+5:30
माैदा : पाेलिसांनी झुल्लर (ता. माैदा) शिवारात केलेल्या कारवचाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. यात ट्रॅक्टर चालकास ...
माैदा : पाेलिसांनी झुल्लर (ता. माैदा) शिवारात केलेल्या कारवचाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. यात ट्रॅक्टर चालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण तीन लाख दाेन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. ६) रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
मसाैदा पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना झुल्लर शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या शिवारात जाऊन नाकाबंदी केली. यात पाेलिसांनी कन्हान नदीच्या पात्राकडून झुल्लर गावाच्या देशेने जात असलेला ट्रॅक्टर थांबवून त्याच्या एमएच-४०/एएच- ३२५७ क्रमांकाच्या ट्राॅलीत रेती असल्याचे निदर्शनास आले. चाैकशीअंती ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे तसेच ती रेती कन्हान नदीच्या पात्रातून चाेरून आणली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी ट्रॅक्टर चालक विलास रमेश बावणे (३७, रा. वडाेदा, ता. कामठी) यास ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर व दाेन हजार रुपयांची रेती असा एकूण ३ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी दिली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक बिराेले करीत आहेत.