सर्व्हिस राेडवर अवैध ट्रक पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:30+5:302021-06-29T04:07:30+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : नागपूर-ओबेदुल्लागंज (भाेपाळ) राष्ट्रीय महामार्गावरील काेराडी (ता. कामठी) नजीकच्या वंजारी भवन ते नांदा फाटा दरम्यान ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : नागपूर-ओबेदुल्लागंज (भाेपाळ) राष्ट्रीय महामार्गावरील काेराडी (ता. कामठी) नजीकच्या वंजारी भवन ते नांदा फाटा दरम्यान डाव्या भागाच्या सर्व्हिस राेडवर सिमेंट वाहतूक करणारे ट्रक राेज उभे केले जात असल्याने याला अवैध पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सर्व्हिस राेड आधीच अरुंद असल्याने ट्रकमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याने हे ट्रक डाेकेदुखी ठरत आहेत.
हा राष्ट्रीय महामार्ग आंतरराज्यीय असल्याने या महामार्गावरील २४ तास वाहनांची वर्दळ सुरू असते. या महामार्गालगत वंजारी भवन ते नांदा फाटा दरम्यान सिमेंटची गाेदामे आहेत. त्यामुळे या भागात सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकची सतत ये-जा सुरू असते. या ठिकाणी ट्रक अथवा अन्य वाहनांचे काेणतेही पार्किंग नसताना हे ट्रक सर्व्हिस राेडवर रांगेने उभे केले जातात.
याच ठिकाणाहून ट्रकमधील सिमेंटची पाेती गाेदामांमध्ये हलविली जातात. त्यामुळे ट्रक बराच वेळ उभे असतात. सर्व्हिस राेडची रुंदी आधीच कमी आहे. त्यात ट्रक उभे केले जात असल्याने काही जागा व्यापली जाते. त्यामुळे या सर्व्हिस राेडवरून रहदारी करताना अडचणींना ताेंड द्यावे लागत असून, किरकाेळ अपघातांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी, या सर्व्हिस राेडवर ट्रक उभे करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
...
गाेदाम मालकांना सूचना
या समस्येबाबत काही नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती दिली. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गाेदाम मालकांना पत्र पाठवून सर्व्हिस राेडवरील ट्रकची पार्किंग बंद करण्याची सूचना केली आहे, अशी माहिती सरपंच सरपंच नरेंद्र धानोले व उपसरपंच आशिष राऊत यांनी दिली. या ठिकाणी ट्रक उभे करणे सुरूच असल्याने ही सूचना गाेदाम मालकांनी गांभीर्याने घेतली नाही.