रेल्वेगाड्यात वाढले अवैध व्हेंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:09 AM2021-01-25T04:09:52+5:302021-01-25T04:09:52+5:30
नागपूर : रेल्वेगाड्यात अवैध व्हेंडरची संख्या वाढली आहे. कुठलाही परवाना नसताना हे अवैध व्हेंडर रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थांची विक्री करीत असल्यामुळे ...
नागपूर : रेल्वेगाड्यात अवैध व्हेंडरची संख्या वाढली आहे. कुठलाही परवाना नसताना हे अवैध व्हेंडर रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थांची विक्री करीत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. गुरुवारी रेल्वे सुरक्षा दलाने पाच अवैध व्हेंडरला अटक केली.
रेल्वे प्रशासनाने अधिकृत परवाना दिल्याशिवाय रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थांची विक्री करणे रेल्वे अॅक्ट १४४ नुसार गुन्हा आहे. तरीसुद्धा अनेक अवैध व्हेंडर रेल्वे नियमाकडे दुर्लक्ष करून रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थांची विक्री करतात. रविवारी रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाडी क्रमांक ०२०९४ जोधपूर-पुरी एक्स्प्रेसमध्ये पांढुर्णा ते नागपूर दरम्यान चणे, केळी आणि संत्रा विकत असलेल्या पाच अवैध व्हेंडरला अटक केली. सुरेश बलदेव सिंग (३४) रा. न्यू इंदोरा, राजेंद्र गुलाब मानकर (४४), रूपेश शंकर मस्के (३२) दोघेही रा. संत रविदास वॉर्ड पांढुर्णा, बालेश्वर मारोतराव तायवाडे (२८) रा. तिगाव ता. पांढुर्णा आणि रेवनाथ भाऊराव गोंडे (३३) रा. वसई वॉर्ड पांढुर्णा अशी अवैध व्हेंडरची नावे आहेत. त्यांच्या विरुद्ध रेल्वे अॅक्ट १४४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
...............