आय ॲम नॉट कॅपेबल ... सीएच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:08 AM2020-12-09T04:08:37+5:302020-12-09T04:08:37+5:30
रविकुमार वरदराजन हे सीए असून खरे टाऊनमधील सधन परिवार म्हणून त्यांच्या परिवाराची ओळख आहे. ते श्री अपार्टमेंटमध्ये ३०२ क्रमांकाच्या ...
रविकुमार वरदराजन हे सीए असून खरे टाऊनमधील सधन परिवार म्हणून त्यांच्या परिवाराची ओळख आहे. ते श्री अपार्टमेंटमध्ये ३०२ क्रमांकाच्या सदनिकेत राहतात तर, २०१ क्रमांकाच्या सदनिकेत त्यांचा भाऊ राहतो. त्यामुळे आदित्य त्याच्या काकाच्या सदनिकेत अभ्यासाला जायचा. सोमवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे काकांच्या सदनिकेत गेला. दुपारी त्याच्या वडिलांनी त्याला जेवणासाठी फोन केला असता त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी जाऊन बघितले. सदनिकेचे दार आतून बंद होते. दार ठोठावूनही आतून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता आदित्य गळफास लावून दिसला. वरदराजन यांनी सीताबर्डी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली. तेथे त्यांना एक सुसाईड नोट मिळाली. त्यातून अभ्यासक्रमाचे ओझे जड झाल्याने आदित्यने गळफास लावून आत्महत्या केल्याचा अंदाज पुढे आला.
---
तुम्ही सर्व छान आहात...
आदित्यने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली. त्यात त्याने परिवारातील सदस्य आणि मित्रांना उद्देशून तुम्ही सर्व चांगले आहात. मीच कॅपेबल नाही, असे नमूद केले आहे. दरम्यान, सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
---
पुन्हा एकाने लावला गळफास
आदित्य वरदराजन प्रमाणेच सोमवारी सकाळी विलास प्रभाकर खरे (वय २९, रा. टिमकी) यानेही गळफास लावून आत्महत्या केली. तहसील पोलीस त्याच्या आत्महत्येमागचे कारण शोधत आहेत.
---
महिलेने विष घेतले
जरीपटक्यातील बँक कॉलनीत राहणाऱ्या पूनम ओमप्रकाश बजाज (वय ५४) यांनी रविवारी विष प्राशन करून आत्महत्या केली.
---