मी पॉझिटिव्ह...We Shall Win...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 11:37 AM2020-08-25T11:37:30+5:302020-08-25T11:37:56+5:30

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर तुकाराम मुंढेनी मंगळवारी सकाळी फेसबुकवर नागरिकांसाठी खालील निवेदन केले आहे.

I'm positive ...We Shall Win...! | मी पॉझिटिव्ह...We Shall Win...!

मी पॉझिटिव्ह...We Shall Win...!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. त्यांनी गृहविलगीकरणात जाण्याचा निर्णय घेऊन तसे केलेही आहे. नागरिकांना वेळोवेळी केलेल्या निवेदनात त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन सातत्त्याने असते. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्यांनी मंगळवारी सकाळी फेसबुकवर नागरिकांसाठी खालील निवेदन केले आहे.

कोरोनाच्या संक्रमण काळात यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करताना अनेकांच्या संपर्कात आलो. काळजी म्हणून काही वेळा कोरोना चाचणी केली. मात्र काल केलेल्या चाचणीत 'पॉझिटिव्ह' आलो. लक्षणे नसताना पॉझिटिव्ह आल्याने नियमानुसार 'गृह विलगीकरणा'त आहे. मागील 14 दिवसात जे माझ्या संपर्कात आले असतील, त्यांनी स्वत:ची चाचणी अवश्य करून घ्यावी.

मागील साडेपाच महिने कोरोना या विषाणूशी आपण सगळे लढा देत आहोत. लॉकडाऊन, मिशन बिगीन अगेन या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण थांबविण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न केला. यासाडेपाच महिन्याच्या काळात प्रत्येक कोरोना वॉरियर्सने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी निकराचा लढा दिला. आजही देत आहेत. स्थानिक प्रशासन म्हणून नागपूर महानगरपालिका आजही झटत आहे. वेळोवेळी नागरिकांना आवाहन करीत आहे.

प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित आहे, असे समजून वागा, असे मी स्वत: वेळोवेळी सांगत आहे. कारण काळजी घेतली नाही तर हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी. कोरोनाच्या नागपुरातील एन्ट्रीनंतर अत्यावश्यक सेवा म्हणून कार्य करताना माझ्यासोबत माझ्या प्रत्येक सहकाऱ्याने आवश्यक ती सर्व काळजी घेतली.

मात्र, सेवा देताना कुठे ना कुठे कोरोना रुग्णांशी संपर्क येत गेला. यातून मनपाचे कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. आज मी स्वत: पॉझिटिव्ह निघालो. काळजी म्हणून मी गृह विलगीकरणात राहीन. परंतु, आपल्या सेवेचे कार्य थांबणार नाही. मी जेथे असेल तेथून नागपुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे सुरू राहील. कारण मी जरी पॉझिटिव्ह आलो तरी आपण पॉझिटिव्ह येऊ नये, यासाठी माझी धडपड सुरूच राहील. जे पॉझिटिव्ह आलेत त्यांना योग्य उपचार मिळावे, यासाठी व्यवस्था सुदृढ ठेवण्याचा माझा संकल्प या काळातही पूर्णत्वास नेईन, हा विश्वास देतो.

Web Title: I'm positive ...We Shall Win...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.