आयएमए डॉक्टरांची आज निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:07 AM2020-12-08T04:07:56+5:302020-12-08T04:07:56+5:30
नागपूर : आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या राजपत्रातील ‘सीसीआयएम’च्या अधिसूचनेविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ८ डिसेंबरला ...
नागपूर : आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या राजपत्रातील ‘सीसीआयएम’च्या अधिसूचनेविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ८ डिसेंबरला निदर्शने करणार आहे. त्यानंतरही शासनाने दखल न घेल्यास ११ डिसेंबरला संप करण्याचा इशारा दिला आहे.
आयुर्वेद विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणात ५८ अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. परंतु अॅलोपॅथीमध्ये सर्जन होण्याआधी विविध विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकाचे शिक्षण देणे आणि वरवरचे तंत्र शिकवून शस्त्रक्रियेस परवानगी देणे धोक्याचे ठरू शकते, अशी भूमिका आयएमएने घेतली आहे. ‘सीसीआयएम’च्या अधिसूचनेचा दुष्परिणाम रुग्णांच्या आयुष्यावर होऊ नये याविरोधात ‘आयएमए’ उद्या, मंगळवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत नारे-निदर्शने करणार आहे. या आंदोलनात शासकीयसह खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती नागपूर आयएमए अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी यांनी दिली.