डॉक्टरांच्या सेवाकार्याचा आयएमएने केला गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:33+5:302021-07-02T04:07:33+5:30

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या संकटकाळात स्वत:च्या आरोग्याची चिंता न करता रुग्णांची काळजी घेणाऱ्या आणि आजारातून उभे करणाऱ्या डॉक्टरांच्या कर्तव्याप्रति ...

IMA praises doctor's service | डॉक्टरांच्या सेवाकार्याचा आयएमएने केला गौरव

डॉक्टरांच्या सेवाकार्याचा आयएमएने केला गौरव

Next

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या संकटकाळात स्वत:च्या आरोग्याची चिंता न करता रुग्णांची काळजी घेणाऱ्या आणि आजारातून उभे करणाऱ्या डॉक्टरांच्या कर्तव्याप्रति कृतज्ञता या नात्याने गुरुवारी आयएमएच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. ‘सेव्ह द सेव्हिअर्स’ असा नारा देत समाजाला डॉक्टरांच्या पाठीशी राहण्याचे आवाहनही करण्यात आले. जागतिक डॉक्टर्स डेचे औचित्य साधून उत्तर अंबाझरी मार्गवरील आयएमए सभागृहात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडला. लोकबिरादरी प्रकल्पाचे डॉ. प्रकाश आमटे यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. महापौर दयाशंकर तिवारी, आयएमएचे नागपूर अध्यक्ष डॉ. संजय देवतळे प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ. लोंढे म्हणाले, कोरोनासारख्या संक्रमणाच्या काळात डॉक्टरांची सेवा संपूर्ण जगाने पाहिली आहे. समाजातील डॉक्टरांची प्रतिमा यापेक्षा अधिक उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. आयएमए मेंबरशिप वाढविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी ठाकरे यांनी डॉक्टरांच्या सेवेला अभिवादन केले. त्यांच्या योगदानामुळेच संक्रमणावर मात करता आली. दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण व शहरी भागात मिळालेल्या मदतीचा तसेच आयएमए नागपूरच्या सहकार्याचा त्यांनी गौरव केला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, ज्येष्ठ अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अविनाश महालक्ष्मे, जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रक्षा ओला यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. अशोक अढाव, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. वंदना काटे, डॉ. अजय काटे, डॉ. संजय देशपांडे, डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. वर्षा ढवळे, डॉ. वैशाली खंडाईत, डॉ. अविनाश वासे, डॉ. आशिष दिसावल, डॉ. कुश झुनझुनवाला आदी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. मनीषा राठी, डॉ. दीबा सदाफ आणि स्वाती सारडा यांनी संयोजक म्हणून काम पाहिले. सचिव डॉ. सचिन गाठे यांनी आभार मानले.

...

डॉक्टरांवरील हिंसाचाराबद्दल चिंता

डॉ. देवतळे यांनी डॉक्टरांच्या योगदानाचा पुनरुच्चार केला तसेच डॉक्टरांवरील हिंसाचाराबद्दलही खेदयुक्त भावना व्यक्त केल्या. नागपुरातही अशा घटना घडल्याकडे लक्ष वेधले. समाजाने आमची सेवा समजून घ्यावी तसेच शासनाने लक्ष पुरवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

...

यांचा झाला सत्कार

आयएमएच्या माध्यमातून शहरात १५५ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उभारून रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले होते. त्या सर्व कोविड हॉस्पिटलचा सत्कार करण्यात आला. तसेच आयएमएच्या वतीने या समारंभात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. रमेश भेदे, डॉ. बी. पी. खोब्रागडे, डॉ. सुरेश चारी, डॉ. अखिलेश संगावार, डॉ. अजीज खान, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. सिंधू भुते, डॉ. छाया लांजेवार, डॉ. सुनील लांजेवार, डॉ. संजय पराते, डॉ. सुधीर नेरळ, डॉ. नीलम मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला.

...

Web Title: IMA praises doctor's service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.