आयएमएची चौकाचौकांमध्ये निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:06 AM2020-12-09T04:06:12+5:302020-12-09T04:06:12+5:30

नागपूर : आयुर्वेद विद्यार्थ्यांना अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या राजपत्रित‘सीसीआयएम’च्या अधिसूचनेविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) मंगळवारी शहरातील ...

IMA protests at intersections | आयएमएची चौकाचौकांमध्ये निदर्शने

आयएमएची चौकाचौकांमध्ये निदर्शने

Next

नागपूर : आयुर्वेद विद्यार्थ्यांना अ‍ॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या राजपत्रित‘सीसीआयएम’च्या अधिसूचनेविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) मंगळवारी शहरातील २५ चौकांमध्ये एकाचवेळी नारे-निदर्शने केली. आयएमए अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी व सचिव डॉ. राजेश सावरबांधे यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली.

अ‍ॅलोपॅथीमध्ये सर्जन होण्याआधी विविध विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. परंतु आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकाचे शिक्षण देणे आणि वरवरचे तंत्र शिकवून शस्त्रक्रियेस परवानगी देणे धोक्याचे ठरु शकते, याची जनजागृती करीत आज चौकाचौकांमधून ‘आयएमए’च्या सदस्यांनी निदर्शने केली. झाशी राणी चौकात डॉ. अर्चना कोठारी, डॉ. राजेश सावरबांधे, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. गौरी अरोरा यांच्यापासून आंदोलनला सुरुवात झाली. टेलिफोन एक्सचेंज चौकात डॉ. अशोक अढाव, लोकमत चौकात डॉ. दिनेश अग्रवाल, अग्रसेन चौकात डॉ. आशिष दिसावल, खामला चौकात डॉ. अनुप मरार, डॉ. उज्ज्वला देशमुख, डॉ. जगदीश कोठारी, डॉ. समीर जहागीरदार, शंकरनगर चौकात डॉ. संजय देवतळे, छत्रपती चौकात डॉ. विक्रम देसाई, रविनगर चौकात डॉ. वंदना काटे, डॉ. वैदेही मराठे, संविधान चौकात डॉ. राजेश सिंघानिया, डॉ. प्रमोद गांधी, सक्करदरा चौकात डॉ. अविनाश वासे, जगनाडे चौकात डॉ. प्रशांत रहाटे, सदर चौकात डॉ. रफत खान, लता मंगेशकर चौकात डॉ. अनिरुद्ध देवके, मेयो चौकात डॉ. कुश झुनझुनवाला, मेडिकल चौकात डॉ. अमित दिसावल, व्हेरायटी चौकात डॉ. हर्ष देशमुख, प्रतापनगर चौकात उज्ज्वला देशमुख यांच्यासह ‘फेडरेशन ऑफ ऑल मेडिकल असोसिएशन’चे पदाधिकारी व सदस्यांनी निदर्शने करीत शासनाचे लक्ष वेधले.

-आयुर्वेदिक पॅथीला विरोध नाही

‘लोकमत’शी बोलताना आयएमए अध्यक्ष डॉ. कोठारी म्हणाल्या, प्रत्येक पॅथीचे शास्त्र वेगळे आहे. यामुळे प्रत्येकाने आपल्या पॅथीनुसार उपचार करायला हवा. आमचा आयुर्वेदिक पॅथीला विरोध नाही. त्यांचा अ‍ॅलोपॅथीचा प्रॅक्टीस करण्याला विरोध आहे. ‘सीसीआयएम’च्या अधिसूचनेचा दुष्परिणाम रुग्णांच्या आयुष्यावर होऊ नये, यासाठी हे आंदोलन आहे.

Web Title: IMA protests at intersections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.