'गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी, सरकारला सर्वोतपरी मदत करू'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 09:50 PM2020-02-06T21:50:07+5:302020-02-06T21:50:19+5:30

वर्धा जिल्ह्यामधील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिका महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा

'Immediate punishment should be given to the perpetrators of crime, help the government to the best', devendra fadadnvis on women crime | 'गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी, सरकारला सर्वोतपरी मदत करू'

'गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी, सरकारला सर्वोतपरी मदत करू'

Next

नागपूर : राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, तरुणीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाण्याचा झालेला प्रयत्न हा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. यात आम्ही राजकारण करणार नाही. अशा प्रश्नांमध्ये आम्ही सरकारला सर्वतोपरी मदत करू, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

वर्धा जिल्ह्यामधील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिका महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार घडला होता. वर्ध्यातील ही घटना ताजी असतानाच महाराष्ट्र अशाच एका घटनेने पुन्हा एकदा हदरला. औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला जिवंत जाळण्यात आलं. त्यामध्ये महिला 95 टक्के भाजली होती. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनांवरुन महिला संघटना आणि महिला नेत्या आक्रमक झाल्या आहेत. तर, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही घटनांचा निषेध करत ठाकरे सरकारला आवाहन केलंय. आता, देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असलेल्या तरुणीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेले असता फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना सरकारला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं बोलून दाखवलं. अशा गुन्ह्यांतील आरोपींना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. आपल्यातील भांडणं विसरुन कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचं आवाहनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अमृता फडणवीस यांनी केलं आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ या ‘acid attack victors’ साठी असलेल्या योजनेतील सवलती अंकिताला देण्यात याव्यात. महिला आयोग अध्यक्षाचे पदही लवकर भरण्यात यावे, माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जमिनीवर येऊन पूर्ण करा, असेही म्हणत उद्धव ठाकरेंच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅगही केलं आहे.

Web Title: 'Immediate punishment should be given to the perpetrators of crime, help the government to the best', devendra fadadnvis on women crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.