नुकसानग्रस्त शेतीपिकाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By गणेश हुड | Published: October 3, 2023 03:40 PM2023-10-03T15:40:27+5:302023-10-03T15:41:13+5:30
सतरा हजाराहून अधिक पंचनामे झाले
नागपूर : नागपूर जिल्ह्यात २१ ते २५ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे तसेच सोयाबीन पिकावर आलेल्या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
पावसामुळे पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांचे शेतीपिकाचे प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत स्थानिक आपत्ती या घटकाखाली नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतक यांनी पिक विमा कंपनी किवा कृषि विभागाकडे दाखल सूचनापत्र (इंटीमेशन) नुसार सर्व संयुक्त पंचनामे पिक विमा कंपनी आणि कृषि विभागाव्दारे केले जात आहे. पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांनी या विभागाला निर्देश दिले आहेत.
तालुकानिहाय नुकसानग्रस्त शेतपिकाचे पंचनामे
कुही -४१२
मिवापूर-३६९६
उमरेड-३११०
नरखेड- २६१७
काटोल-१०३०
कळमेश्वर-२०३
नागपूर ग्रामीण-५९२
हिंगणा-४७४
कामठी-३११
पारशिवनी-३३३
रामटेक-२३९
मौदा-२०३
एकूण- १७.५५९