समन्वयातून निर्जंतुकीकरण तातडीने पूर्ण करा! महापौर संदीप जोशी यांचे प्रशासनाला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 11:08 PM2020-04-04T23:08:50+5:302020-04-04T23:09:55+5:30

मनपातर्फे शहरात विविध ठिकाणी हाती घेण्यात आलेले निर्जंतुकीकरण आणि फवारणीचे काम लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयातून तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी दिले.

Immediately complete the sterilization by coordination! Mayor Sandeep Joshi directs administration | समन्वयातून निर्जंतुकीकरण तातडीने पूर्ण करा! महापौर संदीप जोशी यांचे प्रशासनाला निर्देश

समन्वयातून निर्जंतुकीकरण तातडीने पूर्ण करा! महापौर संदीप जोशी यांचे प्रशासनाला निर्देश

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील सॅनिटायझेशन व फवारणीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’शी लढा देण्यासाठी मनपातील अधिकारी, कर्मचारी मेहनत करीत आहेत. याशिवाय लोकप्रतिनिधीही त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारी आपल्या स्तरावर सोडवून नागरिकांना दिलासा देत आहेत. परिस्थितीशी सर्वच लढा देत आहेत. मनपातर्फे शहरात विविध ठिकाणी हाती घेण्यात आलेले निर्जंतुकीकरण आणि फवारणीचे काम लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयातून तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी दिले.
सॅनिटायझेशन व फवारणी बाबत नागरिक व लोकप्रतिनिधींच्या तक्रारींवर शनिवारी मनपा मुख्यालयातील महापौर कक्षापुढील आवारात महापौरांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष पिंटु झलके, आयुक्त तुकाराम मुंढे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, तसेच सर्व झोनचे अधिकारी (स्वच्छता) उपस्थित होते.
प्रारंभी महापौरांनी सॅनिटायझेशन आणि फवारणीचा झोननिहाय आढावा घेतला. शहरात दररोज निर्जंतुकीकरण केले जाते. गर्दीच्या ठिकाणी तसेच ज्या भागात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले त्या भागात प्राधान्याने फवारणी केली जात आहे. शहरातील बºयाचशा भागांमध्ये बहुतांश निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती यावेळी प्रदीप दासरवार यांनी दिली.
कोरोनाच्या भीतीमुळे सर्वच भागातून निर्जंतुकीकरणाची मागणी केली जात आहे. नागरिकांच्या या असंतोषाचा सामना स्थानिक नगरसेवकांना करावा लागतो. निर्जंतुकीकरण आणि फवारणीसंदर्भात संबंधित झोनल अधिकाऱ्यांनी स्थानिक नगरसेवकांंशी समन्वय साधून उर्वरित भागातील निर्जंतुकीकरणाचे कार्य तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संदीप जोशी यांनी दिले.
नेहरूनगर झोनमधील अनेक भागामध्ये फवारणी झाली नसल्याच्या तक्रारी दररोजच नागरिकांकडून येत आहेत. दुसरीकडे प्रशासनाकडून निर्जंतुकीकरण आणि फवारणीसंदर्भात बहुतांश काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरण आणि फवारणीसंदर्भात दैनंदिन माहिती नगरसेवकांना देण्यात यावी, असे निर्देश मनिषा कोठे यांनी दिले.
आरोग्य विभागामार्फत संपूर्ण शहरात कार्य सुरू आहे. मात्र प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी समन्वयातून कार्य केल्यास त्याचे अधिक चांगले परिणाम दिसून येतील, असे मत पिंटू झलके यांनी मांडले. अरुंद रस्ते असणाºया ठिकाणी हे वाहन जाऊ शकत नाही. हँन्ड फॉगिंग मशीनचीही मनपाकडे कमी आहे. त्यामुळे अरुंद रस्ते आणि वस्त्यांकरिता छोट्या वाहनांची व्यवस्था करण्याची सूचना संदीप जाधव यांनी मांडली.
कोरोनाशी लढा देण्यासाठी मनपाचा आरोग्य आणि स्वच्छता विभाग उत्तम कार्य करीत आहे. कामाची गती पुढेही अशीच कायम ठेवावी, अशी अपेक्षा वीरेंद्र कुकरेजा यांनी व्यक्त केली. निर्जंतुकीकरणासंदर्भात लोकांना काही माहिती दिली जात नसल्याने नागरिक नगरसेवकांवर रोष व्यक्त करतात. निर्जंतुकीकरण गाडीवर कोरोना जनजागृतीसह वापरण्यात येणाऱ्या औषधाची माहिती देणारी ऑडिओ क्लिप वाजण्यात यावी, अशी सूचना प्रवीण दटके यांनी मांडली.

निर्जंतुकीकरण १० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार : तुकाराम मुंढे
शहरातील बहुतांश भागातील निर्जंतुकीकरण कार्य लवकरच पूर्ण होण्याची स्थिती आहे. मनपाद्वारे मोठ्या वस्त्यांवर वाहन आणि लहान वस्त्यांमध्ये छोट्या मशीनद्वारे सोडियम हायपोक्लोराईड मिश्रणाची फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जात आहे. येत्या १० एप्रिलपर्यंत संपूर्ण शहरात १०० टक्के निर्जंतुकीकरण कार्य होईल, असा विश्वास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी व्यक्त केला.
कोरोनापासून बचावासाठी घरात राहणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. मात्र नागरिक अद्यापही याबाबत गांभीर नसल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता आणखी पुढे काही दिवस कॉटन मार्के ट सुरू करता येणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या सूचनांचा विचार करून त्यावरही अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच निर्जंतुकीकरण आणि फवारणी संदर्भातील दैनंदिन माहितीचा अहवालही सर्व नगरसेवकांना देण्यात येईल. फायलेरिया विभागामार्फत होणाऱ्या फवारणीचेही कार्य प्रगतिपथावर आहे. या फवारणीसाठी प्रत्येक झोनमधील तीव्र संवेदनशील, मध्यम संवेदनशील आणि कमी संवेदनशील अशा भागांची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामुळे तीव्र संवेदनशील भागांमध्ये फवारणीला प्राधान्य दिले जात आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच भागात वैज्ञानिक पद्धतीने फवारणी केली जात आहे. याशिवाय डासांची पैदास होणारी ठिकाणे शोधून त्या ठिकाणीही फवारणी केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक न होता घरीच बसून रहावे, असे आवाहनही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी केले.

बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन
कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे सर्वत्र गर्दी टाळण्याचे निर्देश दिले जात आहेत. त्यानुसार शनिवारी झालेल्या बैठकीमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. महापौर कक्षामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र बैठकीमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता संदीप जोशी यांनी महापौर कक्षासमोरील आवारामध्ये बैठक घेतली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आवारामध्ये तीन फुटाचे अंतर ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: Immediately complete the sterilization by coordination! Mayor Sandeep Joshi directs administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.