ताजबाग प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करा :महानगर आयुक्तांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:18 AM2019-01-23T00:18:05+5:302019-01-23T00:19:17+5:30

हजरत बाबा ताजुद्दीन यांचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक मोठा ताजबाग दर्गा येथे येत असतात. प्रसिद्ध मोठा ताजबाग दर्गा आणि परिसरात शासकीय निधीतून महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) मार्फत सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महानगर आयुक्त व नासुप्रच्या सभापती शीतल उगले यांनी मंगळवारी दिले. उगले यांनी मोठा ताजबाग परिसराची पाहणी करून प्रकल्पांची माहिती घेतली.

Immediately complete the Taj Bagh project: the Metropolitan Commissioner's instructions | ताजबाग प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करा :महानगर आयुक्तांचे निर्देश 

ताजबाग प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करा :महानगर आयुक्तांचे निर्देश 

googlenewsNext
ठळक मुद्देनिमार्णाधीन विकास कामांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हजरत बाबा ताजुद्दीन यांचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक मोठा ताजबाग दर्गा येथे येत असतात. प्रसिद्ध मोठा ताजबाग दर्गा आणि परिसरात शासकीय निधीतून महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) मार्फत सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महानगर आयुक्त व नासुप्रच्या सभापती शीतल उगले यांनी मंगळवारी दिले. उगले यांनी मोठा ताजबाग परिसराची पाहणी करून प्रकल्पांची माहिती घेतली.
उगले यांनी निरीक्षण करून सर्व कामांचा तपशील संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतला. विकास प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच ताजबाग परिसरात स्वछता कायम ठेवण्यासाठी हजरत ताजुद्दीन ट्रस्टच्या प्रशासकांनी व स्थानीय नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उगले यांनी केले. यावेळी एनएमआरडीएचे अप्पर जिल्हाधिकारी व नासुप्रचे अतिरिक्त महा व्यवस्थापक सुधाकर कुळमेथे, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार आणि कार्यकारी अभियंता प्रशांत भांडारकर, सहाय्यक अभियंता पंकज पाटील तसेच नासुप्रचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Immediately complete the Taj Bagh project: the Metropolitan Commissioner's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.