आराेग्य याेजनांची अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:09 AM2021-03-24T04:09:37+5:302021-03-24T04:09:37+5:30
कामठी शहर व ग्रामीण भागात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला असून, अनेक खासगी रुग्णालयांत शासनाच्यावतीने काेविड केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...
कामठी शहर व ग्रामीण भागात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला असून, अनेक खासगी रुग्णालयांत शासनाच्यावतीने काेविड केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात रुग्णांच्या नातेवाईकांकडून खासगी डाॅक्टर पैशाची वसुली करीत असल्याने नागरिकांना समस्यांना ताेंड द्यावे लागत आहे. याबाबत तालुका प्रशासनाकडे तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. ज्या खासगी रुग्णालयांतील काेविड केंद्रातून काेराेना रुग्णांना सेवा उपलब्ध हाेत आहे, त्या रुग्णालयांत महात्मा जोतिबा फुले जनआराेग्य याेजना, आयुष्मान भारत याेजनेंतर्गत नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
तहसीलदार हिंगे यांना निवेदन देताना एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष साकीबउर रहमान, तालुका अध्यक्ष मजाहीर अन्वर, शहर अध्यक्ष मंगेश मेश्राम, मोहम्मद तसलीम, शेख जावेद अनवर, अब्दुल करीम आदी उपस्थित हाेते.