शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:12 AM2021-09-07T04:12:29+5:302021-09-07T04:12:29+5:30
नागपूर : भाजप शिक्षक आघाडीने राज्य सरकारचे धोरण शिक्षक विरोधी असल्याचा आरोप करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. नागपुरात ८ ...
नागपूर : भाजप शिक्षक आघाडीने राज्य सरकारचे धोरण शिक्षक विरोधी असल्याचा आरोप करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. नागपुरात ८ सप्टेंबर रोजी संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेची मुख्य मागणी जुनी पेंशन योजना सुरू करावी, अशी आहे.
आघाडीच्या संयोजिका कल्पना पांडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले. राज्य सरकार शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संघटनेकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. सरकारने जुनी पेंशन योजना बंद केली आहे. सरकारला शिक्षकांना दर महिन्याच्या १ तारखेला वेतन देणे अवघड झाले आहे. शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण उशिराने होत असल्याने, अनेक पात्र शिक्षकांना लाभ मिळालेला नाही. संघटनेने जुनी पेंशन लागू करावी, वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण तत्काळ सुरू करावे, पीएफच्या खात्यावर कर्ज उपलब्ध करून द्यावे, दर महिन्याच्या १ तारखेला वेतन देण्यात यावे, शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार मानधन द्यावे, रात्रकालीन शाळेच्या शिक्षकांना पूर्णवेळच्या शिक्षकांप्रमाणे सुविधा द्याव्यात आदी मागण्या संघटनेने केल्या आहे. पत्रपरिषदेला आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, विदर्भ संयोजक अनिल शिवणकर, रजनीकांत बोंद्रे आदी उपस्थित होते.