मनपा शाळात जलसंवर्धन प्रकल्प राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:07 AM2020-12-24T04:07:57+5:302020-12-24T04:07:57+5:30

अतिरिक्त आयुक्तांनी घेतला ‘माझी वसुंधरा अभियाना’चा आढावा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील शासकीय इमारती, मेट्रो स्टेशन, उद्याने, ...

Implement water conservation projects in municipal schools | मनपा शाळात जलसंवर्धन प्रकल्प राबवा

मनपा शाळात जलसंवर्धन प्रकल्प राबवा

Next

अतिरिक्त आयुक्तांनी घेतला ‘माझी वसुंधरा अभियाना’चा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील शासकीय इमारती, मेट्रो स्टेशन, उद्याने, शाळांमध्ये रेन वाॅटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या धर्तीवर शहरातील महापालिका शाळांमध्ये जलपुनर्भरणाच्या संदर्भात कार्यवाही करा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी दिले. महाराष्ट्र शासनाने २ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत राज्यात ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्याचे महापालिकांना निर्देश दिले आहे. सदर नागपुरात मनपाद्वारे अभियान राबविण्यात येत आहे. यासंदर्भात मंगळवारी त्यांनी आढावा घेतला.

अधीक्षक अभियंता (सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी ) डॉ. श्वेता बॅनर्जी, एनएसएससीडीसीएलचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, उपायुक्त अमोल चौरपगार, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) ए.एस.मानकर, कार्यकारी अभियंता धनंजय मेंढुलकर, कार्यकारी अभियंता उज्ज्वल धनविजय, सार्वजनिक आरोग्य अभियंता संदीप लोखंडे, उपविभागीय अभियंता रूपराव राऊत आदी उपस्थित होते.

निपाणे यांनी हरित आच्छादन आणि जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापन, वायू प्रदूषण नियंत्रण, जलसंवर्धन, रेन वॉटर हार्वेस्टिंग व परकोलेशन, नदी, तळे व नाले यांची स्वच्छता, सांडपाणी, मैला व्यवस्थापन व प्रक्रिया, ऊर्जा, पर्यावरण सुधारण व संरक्षणासाठी जनजागृती आदी विषयांचा आढावा घेतला.

.....

नववर्षाला हरित शपथ घ्या

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी २०२१ ला मनपातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये हरित शपथ घेण्यात येणार आहे. यासंबंधी शासनातर्फे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सायकलने कार्यालयामध्ये येतील व सर्व जण एकत्रित ‘हरित शपथ’ घेतील. याशिवाय सर्व झोन कार्यालये, शाळांतही शपथ घेतली जाईल, असे आयुक्त संजय निपाणे यांनी सांगितले.

Web Title: Implement water conservation projects in municipal schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.