तूर, मूग, उडदची आयात खुली; तूरडाळीचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:07 AM2021-05-20T04:07:42+5:302021-05-20T04:07:42+5:30

नागपूर : केंद्र सरकारने १५ मे रोजी अधिसूचना काढून तूर, मूग आणि उडद यांच्या आयातीवर असलेले प्रतिबंध शिथिल केले. ...

Import of tur, green gram and urad is open; Pulses prices have come down | तूर, मूग, उडदची आयात खुली; तूरडाळीचे दर उतरले

तूर, मूग, उडदची आयात खुली; तूरडाळीचे दर उतरले

Next

नागपूर : केंद्र सरकारने १५ मे रोजी अधिसूचना काढून तूर, मूग आणि उडद यांच्या आयातीवर असलेले प्रतिबंध शिथिल केले. त्यामुळे तीन दिवसांतच तूरडाळीचे दर प्रति क्विंटल ३०० रुपयांनी कमी झाले आहेत. याशिवाय तूर, मूग आणि उडदच्या दरात प्रत्येकी प्रतिक्विंटल २०० रुपयांची घसरण झाली आहे.

देश डाळींमध्ये आत्मनिर्भर बनावा आणि शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडदच्या आयातीवर प्रतिबंध लावले होते. या वस्तूंच्या आयातीसाठी सरकार व्यापाऱ्यांना परवाना द्यायचा आणि वर्षभराचे आयातीचे प्रमाण ठरवून दिले जायचे; पण आता आयातीवरील प्रतिबंध हटविल्याने व्यापाऱ्यांना या वस्तूंची आयात कितीही प्रमाणात करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना या वस्तूंची आधारभूत किंमत मिळणार नाही. त्याचा शेतकऱ्यांना तोटा होणार आहे. केंद्राच्या या निर्णयाने बाजारपेठांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होणार आहे. या निर्णयाचा परिणाम बाजारपेठांवर झाला आहे. अचानक भाव कमी होऊ लागले आहेत.

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी १७ मे रोजी बैठक बोलावून देशात डाळींच्या उपलब्धतेची चर्चा केली. व्यापाऱ्यांना स्टॉकची माहिती द्यावी लागेल, असे त्यांनी बैठकीत सांगितले. सरकारतर्फे अधिसूचना जारी होताच तीन दिवसांतच बाजारात खरेदी कमी आणि विक्री जास्त झाल्याचे होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले.

बुधवारी सायंकाळी तुरीत २०० आणि तूरडाळीच्या किमतीत ३०० रुपयांची घसरण झाली. मुंबई आयातीत लेमन तूर प्रतिक्विंटल ६,५०० ते ६,३००, नागपुरात गावरान तुरीचे दर ७,१५० रुपयांवरून कमी होऊन ६,९५० आणि डाळीचे भाव ८,७०० ते १० हजार १०० रुपये होते. याशिवाय आयातीत उडद मुंबई पोर्टवर २०० रुपयांनी कमी होऊन ६,८००, उडद मोगर ८,४०० ते १० हजार ७०० रुपये आणि चण्यात २०० रुपयांची घसरण झाली. चणाडाळीचे भाव ६,१०० ते ६,७०० रुपयांवर स्थिरावले. मसूरमध्ये ३०० रुपयांची घसरण होऊन डाळीचे भाव ६,६०० ते ६,८०० रुपयांपर्यंत कमी झाले. तर मूग मोगर ८,५०० ते १० हजार ५०० रुपयांपर्यंत कमी झाले. केंद्राच्या निर्णयाचा परिणाम पुढेही घसरणीवर होणार आहे. कोरोना लॉकडाऊन काळात सरकारचा निर्णय चुकीचा असून, त्यामुळे व्यवसायात घसरण होऊन व्यापाऱ्यांना आर्थिक फटका होणार असल्याचे मोटवानी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Import of tur, green gram and urad is open; Pulses prices have come down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.