शिक्षेपेक्षा तरुणांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणे महत्त्वाचे : पोलीस आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:07 AM2019-01-03T00:07:16+5:302019-01-03T00:08:21+5:30

तरुण पिढीमध्ये नैतिकता आणि सामाजिक दायित्वाची भावना कमी होत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे त्यांची वाटचाल वाढत आहे. त्यामुळे ते ड्रग्स, मादक पदार्थांचे सेवन व तस्करी तसेच सायबर गुन्हेगारीकडे वळत आहेत. समाजासाठी हे धोक्याचे संकेत आहेत. मात्र वाममार्गाकडे वळणाऱ्या तरुणांना दंडात्मक कारवाई व शिक्षा देण्यापेक्षा त्यांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणे अधिक महत्त्वाचे असून, तेच आमचे ध्येय असल्याची ग्वाही शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.

Important to keep youth away from crime than punishment: Police Commissioner | शिक्षेपेक्षा तरुणांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणे महत्त्वाचे : पोलीस आयुक्त

शिक्षेपेक्षा तरुणांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणे महत्त्वाचे : पोलीस आयुक्त

Next
ठळक मुद्दे‘छात्र पोलीस’ संकल्पनेशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जोडणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तरुण पिढीमध्ये नैतिकता आणि सामाजिक दायित्वाची भावना कमी होत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे त्यांची वाटचाल वाढत आहे. त्यामुळे ते ड्रग्स, मादक पदार्थांचे सेवन व तस्करी तसेच सायबर गुन्हेगारीकडे वळत आहेत. समाजासाठी हे धोक्याचे संकेत आहेत. मात्र वाममार्गाकडे वळणाऱ्या तरुणांना दंडात्मक कारवाई व शिक्षा देण्यापेक्षा त्यांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणे अधिक महत्त्वाचे असून, तेच आमचे ध्येय असल्याची ग्वाही शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.
तरुण पिढीला गुन्हेगारीपासून परावृत्त करून सजग आणि सतर्क नागरिक बनविण्याच्या दृष्टीने शहर पोलीस विभागातर्फे महत्त्वाची ‘छात्र पोलीस’ संकल्पना राबविण्यात येत असून, या संकल्पनेचा शुभारंभ बुधवारी पोलीस आयुक्त ांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश पांडे, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अपर आयुक्त बी.जी. गायकर, कॉलेजचे महासचिव गोविंद अग्रवाल, सचिव राजेंद्र पुरोहित, मैत्री परिवाराचे चंदू पेंडके तथा महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. उपाध्याय पुढे म्हणाले, तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करणे ही आमची जबाबदारी आहे. प्रबोधनात मोठी शक्ती असते व या माध्यमातून तरुणांना व विशेषत: विद्यार्थ्यांना गुन्हेगारीच्या दुष्परिणामाबाबत जागृत केले जाऊ शकते. गुन्हेगारीच्या गर्तेत अडकल्याने आपले करिअर नष्ट होईल आणि आपल्याला विदेशातही जाण्याची शक्यता बंद होईल, ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये झाल्यास ते गुन्हेगारीपासून स्वत:च दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. उपाध्याय यांनी सांगितले, राज्यात दरवर्षी ११ हजार नागरिकांचा रस्ते अपघातात बळी जातो. यामध्ये १६ ते ३५ वर्षे वयोगटातील लोकांची संख्या ८० टक्के असून, हा आकडा भयावह आहे. बहुतेक अपघात हे मानवी चुकींमुळे होतात. विद्यार्थ्यांना जागृत करून यातील १० ते १५ टक्के मृत्यू टाळले जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना गुन्हेगारीपासून, नशेच्या सेवनापासून दूर करणे, वाहतूक नियम आणि दहशतवादाबाबत जागृत करण्यासाठी छात्र पोलीस अभियानाचा आरंभ करण्यात आला असून, ही संकल्पना संपूर्ण देशात राबविण्याची ग्वाही पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली. यापूर्वी मिशन मृत्युंजय अभियान राबविण्यात आले होते व यासोबत सव्वा लाख विद्यार्थ्यांना जोडण्यात आले होते.
नंतर हे अभियान राज्यभरात लागू करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीसीपी राहुल माणकीकर व संचालन निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी केले. डीसीपी संभाजी कदम यांनी आभार मानले.
महाविद्यालयात दाखविणार सीडी
या अभियानांतर्गत नित्यानंद तिवारी यांच्या दिग्दर्शनात वाहतूक, गुन्हेगारीचा विळखा, ड्रग्स अ‍ॅडिक्शन व दहशतवाद याबाबत जागृती करणारी फिल्म तयार करण्यात आली असून, यामध्ये स्वप्निल राऊत व इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अभिनय केला आहे. कॉलेजच्या परिसरातच याचे चित्रीकरण करण्यात आले. ही सीडी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय व चित्रपटगृहात दाखविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

Web Title: Important to keep youth away from crime than punishment: Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.