उत्पादन शुल्क विभागाचे हॉटेल-ढाब्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 11:37 PM2019-09-06T23:37:48+5:302019-09-06T23:39:18+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज)च्या पथकाने गुरुवारी रात्री दारूची विक्री करणाऱ्या हॉटेल व ढाब्यांवर छापे मारून कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज)च्या पथकाने गुरुवारी रात्री दारूची विक्री करणाऱ्या हॉटेल व ढाब्यांवर छापे मारून कारवाई केली. छाप्याच्या दरम्यान दोन हॉटेल्सचे संचालक, दोन अल्पवयीन आणि १९ दारू पिणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यात आली.
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी विना परमिट दारू पिण्याची परवानगी देणाऱ्या हॉटेल्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्याच अनुषंगाने पथकाने वाडी, हिंगणा टी-पॉईंट येथील हॉटेल पायल आणि अमरावती रोडवरील विरा दा ढाब्यावर छापे मारले. दोन्ही ठिकाणी ग्राहकांना विना परमिट खुलेआम दारू पिण्याची सवलत दिली जात होती. कारवाईदरम्यान पथकाने सहा हजार रुपयाचे सामान जप्त केले. यावेळी, जरीपटका येथील घनश्याम साधवानी, रोहित खत्री, वाडी येथील राजेश रेखालाल ठाकरे, राजेश हरीखेडे, राजेश ऊर्फ अविनाश गजभिये, रामदासपेठ येथील गुरुजितसिंह चोपडा, साईनगर वाडी येथील विलास हिंगवे, हिंगणा रोड येथील जयेश वासनिक, दत्तवाडी येथील सुशिल कुमार सिंह, लालसिंह हावसिंह, हिंगणा वैशालीनगर येथील प्रमोद लोनबडे, यादवनगर येथील अशोक खानचंदानी, लावा वाडी येथील सूरज ढोक, गोधनी येथील विजय सिंह उईके, झिंगाबाई टाकळी येथील अश्विन चुनीलाल भाईसा, निखिल यादव, टाकळी येथील मोहम्मद इमरान मो. शफी, राजनगर येथील मनदीप सिंह रणदेव, इंदोरा जसवंत टॉकीज येथील दीपक दर्यानी, हजारी पहाड येथील वीरेंद्र यादव, भामटी येथील चैतन्य देसाई, अत्रे ले-आऊट येथील शांतनू देशकर, प्रतापनगर येथील अश्विन पेंडके यांच्यावर कारवाई करण्यात आली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आले. ही कारवाई निरीक्षक बाळासाहेब पाटील, दुय्यम निरीक्षक शैलेश अजमिरे यांच्या पथकाने केली. विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या निर्देशानुसार अशा प्रकारची कारवाई नियमित केली जाणार असल्याची माहिती
दुय्यम निरिक्षक रावसाहेब कोरे यांनी दिली.