महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्यास कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2016 01:15 AM2016-09-24T01:15:55+5:302016-09-24T01:15:55+5:30

यशोदरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरामातानगर येथील एका महिलेवर कुऱ्हाडीने वार करून जखमी करणाऱ्या

Imprisoner for the woman who attacked the Kurhadi | महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्यास कारावास

महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्यास कारावास

Next

दंडाच्या रकमेतील तीन हजार जखमी महिलेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश
नागपूर : यशोदरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरामातानगर येथील एका महिलेवर कुऱ्हाडीने वार करून जखमी करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील तीन हजार रुपये जखमी महिलेला नुकसानभरपाई म्हणून द्यावे, असा आदेशही न्यायालयाने दिला.
शिवा अशोक सरोदे (२५), असे आरोपीचे नाव आहे. तर जानकीबाई धरमपाल शिवणे (४५), असे जखमी महिलेचे नाव होते.
सरकार पक्षानुसार जखमी महिला आणि आरोपी एकाच मोहल्ल्यात राहतात. जानकीबाई ही १४ मार्च २०१५ रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास समाजभवन नजीकच्या आपल्या घरासमोर मोहल्ल्यातील आणखी काही महिलांसोबत बसलेली होती. या महिला हसत होत्या आणि एकमेकींशी बोलत होत्या. त्याचवेळी आरोपी शिवा सरोदे हा तेथून जात असताना त्याला या महिला आपल्यालाच पाहून हसत असल्याचा समज झाला. त्याने या महिलांना शिवीगाळ करीत घर गाठून कुऱ्हाड आणली होती. त्याने जानकीबाईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून तिला जखमी केले होते.
या प्रकरणी जखमी महिलेच्या तक्रारीवरून यशोदरानगर पोलिसांनी भादंविच्या ३०७, ३२४, ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बघेले यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. प्रत्यक्ष साक्षीपुराव्याच्या वेळी न्यायालयापुढे आलेल्या साक्षीनुसार आरोपीला भादंविच्या ३०७ आणि ५०४ या कलमांतर्गतच्या गुन्ह्यातून निर्दोष ठरवण्यात आले. भादंविच्या ३२४ कलमांतर्गतच्या गुन्ह्यात मात्र त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली.
न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. विजय बनसोड यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल नामदेव पडोळे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Imprisoner for the woman who attacked the Kurhadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.