नागपुरात  विनयभंग करणाऱ्या आरोपीला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 09:44 PM2018-04-17T21:44:39+5:302018-04-17T21:44:49+5:30

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. तसेच, २००० रुपये दंड ठोठावून ती रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश दिला. न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. हा खटला अवघ्या चार महिन्यात निकाली काढण्यात आला हे येथे उल्लेखनीय.

Imprisonment for molestation to accused in Nagpur |  नागपुरात  विनयभंग करणाऱ्या आरोपीला कारावास

 नागपुरात  विनयभंग करणाऱ्या आरोपीला कारावास

googlenewsNext
ठळक मुद्देविशेष सत्र न्यायालय : चार महिन्यात दिला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. तसेच, २००० रुपये दंड ठोठावून ती रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश दिला. न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. हा खटला अवघ्या चार महिन्यात निकाली काढण्यात आला हे येथे उल्लेखनीय.
संदीप रामचंद्र पंधरे (२२) असे आरोपीचे नाव असून तो मोहगाव (जंगली), ता. सावनेर येथील रहिवासी आहे. १५ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी १२ च्या सुमारास पीडित मुलगी महाविद्यालयातून घरी परतली. दुपारी २.३० च्या सुमारास ती स्रान करायला गेली. दरम्यान, तिला स्रानगृहाच्या दाराबाहेर कुणीतरी उभे असल्याचे दिसले. तिने दाराच्या खालून बाहेर पाहिले असता आरोपी तेथे उभा होता. त्यामुळे तिने आरडाओरड केली. तसेच, लगेच वस्त्र परिधान करून स्रानगृहाच्या बाहेर आली. ती घरात गेली असता आरोपी आधीच तेथे लपलेला होता. आरोपीने मुलीसोबत अश्लील वर्तन केले. मुलगी पुन्हा ओरडली असता आरोपीने तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. मुलगी आरोपीच्या ताब्यातून सुटका करून बाहेर आली व घराचे दार बाहेरून बंद केले. आरोपी घरात होता. त्यानंतर मुलीने इतरांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, आरोपी खिडकी तोडून पळून गेला होता. मुलीच्या तक्रारीनंतर खापा पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली.

Web Title: Imprisonment for molestation to accused in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.