... अन् इंग्रजीत वडिलांचे नावच बदलले; मतदार यादीतले चमत्कारिक घोटाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 07:21 PM2022-03-02T19:21:19+5:302022-03-02T19:22:04+5:30

Nagpur News मतदार यादीत आपले नाव ऑनलाईन शोधणाऱ्या एका मतदाराला धक्काच बसला. मराठीत त्याचे नाव बरोबर आहे. परंतु इंग्रजीमध्ये मात्र त्याच्या वडिलांचे नावच बदलविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

... In English, the father's name changed; Miraculous scams in the voter list | ... अन् इंग्रजीत वडिलांचे नावच बदलले; मतदार यादीतले चमत्कारिक घोटाळे

... अन् इंग्रजीत वडिलांचे नावच बदलले; मतदार यादीतले चमत्कारिक घोटाळे

Next
ठळक मुद्दे वेळीच त्रुटी दुरुस्त होण्याची गरज

नागपूर : मतदार यादीतील चुका या नवीन नाहीत. कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे मतदाराला ऐन निवडणुकीच्यावेळी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यानंतरही यादीतील या चुका कमी होण्याचे प्रकार काही थांबलेले नाहीत. निवडणुकीला अजून उशीर आहे. दरम्यान, मतदार यादीत आपले नाव ऑनलाईन शोधणाऱ्या एका मतदाराला धक्काच बसला. मराठीत त्याचे नाव बरोबर आहे. परंतु इंग्रजीमध्ये मात्र त्याच्या वडिलांचे नावच बदलविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बबन पांडुरंग वानकर (५६) असे या मतदाराचे नाव आहे. ते दक्षिण-पश्चिम नागपुरातील गल्ली नंबर ४ जोगीनगर, भीमनगर येथे राहतात. दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाग क्रमांक ३१० मध्ये अनुक्रमांक ९४० वर त्यांचे नाव आहे. बबन यांनी मतदार यादीत त्यांचे नाव शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन वोटर सर्च केले. परंतु नो रेकॉर्ड फाऊंड असेच लिहून येत होते. अनेकदा शोधूनही नाव सापडत नव्हते. अखेर त्यांनी त्यांच्या जुन्या मतदार कार्डावर असलेली लहान-सहान सर्व माहिती भरली तेव्हा त्यांचे नाव सापडले. परंतु त्यात त्यांचे मराठीत असलेले नाव पूर्णपणे बरोबर होते, तर त्याच्याच पुढे इंग्रजी भाषेत मात्र त्यांच्या वडिलांचे नावच बदलले होते. हे केवळ एक उदाहरण असले तरी अशा अनेक त्रुटी मतदार यादीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवडणूक आयोगाने वेळीच खबरदारी घेण्याची गरज

मनपा निवडणुकीला अजून वेळ आहे. या लहान-सहान त्रुटी वाटत असल्या तरी ऐन निवडणुकीत याच त्रुटींमुळे मोठा घोळ होतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने ऑनलाईन मतदार यादी अपडेट करताना आधीच काळजी घ्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सिद्धांत पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Web Title: ... In English, the father's name changed; Miraculous scams in the voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार