भविष्यात मधुमेह, हृद्यरोग, कर्करोगासाठी स्पेशलाईज्ड फार्मसी - जगन्नाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2023 01:10 PM2023-01-23T13:10:26+5:302023-01-23T18:23:57+5:30

‘केमिस्ट अँड ड्रगिस्ट कॉन्क्लेव्ह’

in Future Specialized Pharmacy will be for Diabetes, Heart Disease, Cancer - Jagannath Shinde | भविष्यात मधुमेह, हृद्यरोग, कर्करोगासाठी स्पेशलाईज्ड फार्मसी - जगन्नाथ शिंदे

भविष्यात मधुमेह, हृद्यरोग, कर्करोगासाठी स्पेशलाईज्ड फार्मसी - जगन्नाथ शिंदे

Next

नागपूर : फार्मासिस्टची नवी पिढी व्यवसायात येत आहे. भविष्यात मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, कर्करोगासाठी स्पेशलाईज्ड फार्मसी उदयास येईल, असे मत ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टचे अध्यक्ष जगन्नाथ एस. शिंदे यांनी येथे व्यक्त केले.

इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्यातर्फे आयोजित ‘७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस’च्या तिसऱ्या दिवशी, रविवारी ‘कम्युनिटी फार्मासिस्ट सिनारिओ : ग्लोबल टू लोकल’ या विषयावर केमिस्ट व ड्रगिस्ट कॉन्क्लेव्ह पार पडली. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या ‘कॉन्क्लेव्ह’ला मुख्य वक्ते म्हणून इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन, नेदरलँडचे अध्यक्ष डॉ. डॉमनिक जॉर्डन, डेप्युटी ड्रग्ज कंट्रोलर डॉ. ए. रामकृष्णन, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नमंदर, इंडियन हॉस्पिटल फार्मासिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ. पंकज बेक्टर, असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आयोजन समिती सचिव प्रा. मिलिंद उमेकर, विद्यार्थी प्रतिनिधी राहुल लाड, रॉयल फार्मास्युटिकल सोसायटीचे संस्थापक महेंद्र पटेल उपस्थित होते. मंजिरी घरत यांनी सूत्रसंचालन केले.

- ६० टक्के फार्मासिस्ट महिलांना प्रशिक्षित करा

जगन्नाथ शिंदे म्हणाले, भारत ‘गॅट’ फॅमिलीचा सदस्य झाल्यामुळे आता आपली स्पर्धा थेट जागतिक बाजारपेठेशी आहे. अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. त्याचा सामना करण्यासाठी शिक्षण, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर व उत्तम सेवा देण्याशिवाय पर्याय नाही. भारतात ६० टक्के फार्मासिस्ट या महिला आहेत. त्यांना प्रशिक्षित केले तर त्या ग्राहकांना चांगल्या सेवा देऊ शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- काळानुसार औषध विक्रेत्यांच्या भूमिकेत बदल

काळानुसार औषध विक्रेत्यांच्या भूमिकेत बदल होत असून, त्यांनी केवळ व्यावसायिक म्हणून राहण्यापेक्षा आरोग्य सेवाप्रदाता म्हणूनही काम करावे, असे आवाहन डॉ. डॉमनिक जॉर्डन यांनी केले. ते म्हणाले, भौगोलिक स्थिती, उदारमतवादी धोरण, नवे तंत्रज्ञान, नवीन उपचार पद्धती, वाढती स्पर्धा, वैद्यकीय सेवेचा वाढता खर्च अशी अनेक मोठी आव्हाने फार्मा क्षेत्रासमोर आहेत.

Web Title: in Future Specialized Pharmacy will be for Diabetes, Heart Disease, Cancer - Jagannath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.