ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

By आनंद डेकाटे | Published: June 22, 2024 05:12 PM2024-06-22T17:12:50+5:302024-06-22T17:18:59+5:30

‘महाज्योती’च्या संकतेस्थळावर ३ जुलै पर्यंत अर्ज करता येणार.

in nagpur competitive exam coaching opportunity for obc vjnt and sbc students last date of apply is 3rd july | ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

आनंद डेकाटे,नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एस.बी.सी) तील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण राबविण्यात येते. सन २०२४-२५ या वर्षातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी महाज्योतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया १९ जून पासून सुरु केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जुलै आहे. 
www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे.

महाज्योतीमार्फत युपीएससी नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, एमपीएससी राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, एमपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे परीक्षा पूर्व प्रशिक्षण, बँकिंग, एलआयसी, रेल्वे परीक्षा पूर्व प्रशिक्षण या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील,निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

महाज्योतीमार्फत प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यात विद्यावेतन देखील देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी रुजू होताना एकरकमी आकस्मिक निधी देखील देण्यात येणार आहे. प्रशिक्षण हे नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड ही प्रवेश परीक्षा घेऊन करण्यात येणार आहे, असल्याचे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी सांगितले.

Web Title: in nagpur competitive exam coaching opportunity for obc vjnt and sbc students last date of apply is 3rd july

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर