डॉ. सुनील, डॉ. कविता गुप्ता यांना अकादमिक एक्सीलेंस पुरस्कार

By सुमेध वाघमार | Published: January 29, 2024 04:28 PM2024-01-29T16:28:51+5:302024-01-29T16:29:39+5:30

डॉ. सुनीलआणि डॉ. कविता गुप्ता, दोघांनाही असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया, मध्य प्रदेश चॅप्टरच्या २९ व्या वार्षिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

In nagpur dr sunil and dr kavita gupta get academic excellence award for his remarkable contribution in the field of diabetes | डॉ. सुनील, डॉ. कविता गुप्ता यांना अकादमिक एक्सीलेंस पुरस्कार

डॉ. सुनील, डॉ. कविता गुप्ता यांना अकादमिक एक्सीलेंस पुरस्कार

सुमेध वाघमारे , नागपूर : सुनील डायबिटीज केअर अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सुनीलआणि डॉ. कविता गुप्ता, दोघांनाही असोसिएशन आॅफ फिजिशियन आॅफ इंडिया, मध्य प्रदेश चॅप्टरच्या २९ व्या वार्षिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

मधुमेह क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. गुप्ता दाम्पत्य यांना डॉ. त्यागी, डॉ. पी. सी. मनोरिया, डॉ. सुरेश रांका व डॉ. संजय श्रीवास्तव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. सुनील आणि डॉ. कविता गुप्ता हे  गेल्या तीन दशकांपासून मुधमेहाची जनजागृती, संशोधन आणि शिक्षणात गुंतलेले आहेत. डॉ. गुप्ता यांना २१ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत.

Web Title: In nagpur dr sunil and dr kavita gupta get academic excellence award for his remarkable contribution in the field of diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर