गांधीसागर येथे विश्व योग दिवस उत्साहात; योग संपदा तर्फे काढण्यात आली योग संदेश पदयात्रा 

By गणेश हुड | Published: June 21, 2024 04:36 PM2024-06-21T16:36:30+5:302024-06-21T16:37:27+5:30

विश्व योग दिनानिमित्त गांधी सागर उद्यान येथे  योग संपदा, गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्था व विविध योग संस्थेच्या वतीने आयोजित विश्व योग दिन प्रात्यक्षिकासह उत्साहात पार पडला.

in nagpur international yoga day celebrated in gandhi sagar with spirit and yoga sandesh padayatra organised by yoga sampada  | गांधीसागर येथे विश्व योग दिवस उत्साहात; योग संपदा तर्फे काढण्यात आली योग संदेश पदयात्रा 

गांधीसागर येथे विश्व योग दिवस उत्साहात; योग संपदा तर्फे काढण्यात आली योग संदेश पदयात्रा 

गणेश हूड,नागपूर: विश्व योग दिनानिमित्त गांधी सागर उद्यान येथे  योग संपदा, गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्था व विविध योग संस्थेच्या वतीने आयोजित विश्व योग दिन  प्रात्यक्षिकासह उत्साहात पार पडला. यानिमित्त  श्री गुरुदेव सेवा मंडळ येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून योग पदयात्रेला  सुरुवात करण्यात आली, पदयात्रा वंदे मातरम उद्यान, गांधी चौक गंजीपेठ, नातिक चौक, टिळक पुतळा, येथून गांधीसागर उद्यान येथे समारोप करण्यात आला. 

टिळक पुतळा येथे लहान मुलांनी योग प्रात्यक्षिक करून नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी योगशिक्षक गंगाधरराव पोडुलीवार  व किशोर चरडे यांनी विश्व योग दिवसाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दामोदरराव रोकडे व प्रमुख पाहुणे म्हणून नारायणरावजी वडे,पितांबर लुटे, कैलास तानकर,रवि गाडगे, पंकज राऊत,बाबा तिवारी, नीरज चोबे, सारिका  ठाकरे, किरण तांबे , ज्योती अग्रवाल,वर्षा महाकाळकर,नूतन पलांदुरकर,व शालिनी तनमले यांनी योग नृत्य सादर केले. संचालन गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर यांनी केले.

याप्रसंगी योग नृत्य संचालिका मीना भुते, परफेक्ट योगासन संचालिका विद्या चव्हाण, योग शिक्षक मुकुंद  पडवंशी  व नंदू लेकुरवाळे,हेमंत बेहरखेडे, धर्मेंद्र बोरकर,अजय हटेवार व प्रशांत तिळगुळे यांनी योग निमित्त  ब्रह्मकुमारी योग्य साधना, योग नृत्य, गणेशपेठ ग्रुप, परफेक्ट योगासना यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले. योग प्रेमी गंगाधर नेरकर ,डॉ. राजेंद्र चौधरी, बाबा शेंडे, विनोद झाडे, तुकाराम रक्षक,सुरेश उपाध्याय, रमेश ठाकरे, रुपेश माकाने, देवाजी ढगे, मोरेश्वर कावडकर, सचिन पेंडके, प्रकाश भद्रिंगे, राजू धर्मे, बबनरावजी खंगार,भगवान रामटेके, सचिन सांगोळे, प्रवीण झुलेवाले प्रशांत वझरकर, डॉक्टर प्रकाश वंजारी प्रशांत चलपे, राजेंद्र जयस्वाल, दीपक जयस्वाल, देवेंद्र नेरकर, सुरेश वाडीभस्मे, डॉ. अरुण इंगोले, प्रकाश तिळगुळे, राजेश त्रिपाठी,  रमभाड, नंदा पडोळे, मृणाली वंजारी, सूर्यवंशी, देवगडे, सीमा वेरुळकर,  रहाटे  आदी उपस्थित होते.

Web Title: in nagpur international yoga day celebrated in gandhi sagar with spirit and yoga sandesh padayatra organised by yoga sampada 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.