२ कोटींची खंडणी दे नाहीतर जावयासह तुला ठार मारेल; ज्वेलरी मालकाला धमकीचा फोन
By योगेश पांडे | Published: June 10, 2024 04:56 PM2024-06-10T16:56:35+5:302024-06-10T16:56:57+5:30
नागपूर शहरातील एका ज्वेलरी दुकानाच्या मालकाला फोनवरून धमकी देण्यात आली.
योगेश पांडे, नागपूर : शहरातील एका ज्वेलरी दुकानाच्या मालकाला फोनवरून धमकी देण्यात आली. जर दोन कोटींची खंडणी दिली नाही तर ज्वेलरला त्याच्या जावयासह जीवे मारण्याची भिती दाखविण्यात आली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मोहन विश्वनाथ डोमडे (५०, अनंतनगर) असे व्यापाऱ्याचे नाव असून त्यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. ८ जून रोजी दुपारी त्यांना ९१२२३१२३९२०८ व १६४७२९८३७८३ या क्रमांकावरून फोन आले. तुला प्रोटेक्शन हवे असेल तर दोन कोटींची खंडणी द्यावी लागेल. जर पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या जावयाला जीवे मारेन. माझ्याकडे काडतुसे व ते चालविणाऱ्यांची कमतरता नाही. ट्रूकॉलरवर माझा क्रमांक पाहून घे अशी धमकी दिली. तसेच मोहन यांची गाडीदेखील तोडण्याची धमकी दिली. डोमडे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.